Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल

खरंतर देशातील शिक्षण व्यवस्थाच सिसोदियांकडे सोपवायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Arvind Kejriwal and Manish Sisodia
Arvind Kejriwal and Manish SisodiaSakal
Updated on

गांधीनगर : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचं काम इतकं मोठं आहे की, त्यांच्यासारख्या व्यक्तीला भारतरत्ननं सन्मानित करायला हवं, असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या सिसोदिया यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (People like Manish Sisodia should be given Bharat Ratna says Arvind Kejriwal)

येत्या काळात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं गुजरात जिंकण्याच्या इराद्यानं तिथं जोरदार प्रचार सुरु केला आहे. याच कारणासाठी केजरीवाल आज गुजरात दौऱ्यावर आहेत. दिल्लीचा आम्ही जसा विकास केला तसाच गुजरातचा करु, अशी आश्वासनं त्यांनी इथल्या जनतेला दिली आहेत.

Arvind Kejriwal and Manish Sisodia
DA Arrears: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना काळातील थकीत 'महागाई भत्ता'

त्याचबरोबर सिसोदिंयावरील कारवाईविरोधात बोलताना केजरीवाल म्हणाले, सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणल्या ज्या इतर पक्षांना ७० वर्षात करता आल्या नाहीत. त्यामुळं खरंतर अशा व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा. संपूर्ण देशाचीच शिक्षण व्यवस्था सिसोदियांकडे सुपूर्द करायला हवी, पण त्याऐवजी सीबीआयनं त्यांच्यावर छापेमारी सुरु केली आहे.

दरम्यान, गुजराती जनतेला आश्वासनं देताना केजरीवाल म्हणाले, आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की, आम्ही गुजरातींना मोफत आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवू. जसं की मोहल्ला क्लिनिक, हेल्थ क्लिनिक्स शहरांमध्ये आणि गावांमध्येही सुरु करु. सरकारी रुग्णालयांचा चेहरा-मोहरा बदलून टाकू. जर गरज पडलीच तर आणखी नवी सरकारी रुग्णालये उभारू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()