Congress MLA Jandel: 'जनतेने माझी गाढवावर बसवून धिंड काढावी...'  काँग्रेस आमदाराची अजब इच्छा 

पाऊस पडावा म्हणून सुचवली युक्ती
MLA Babu Jandel
MLA Babu JandelSakal
Updated on

ग्वाल्हेर - हल्ली कुणाला कशाची इच्छा होईल काही सांगता येत नाही. त्यात राजकीय लोक तर सोशल मीडियावर कोणती इच्छा व्यक्त करतील काहीच सांगता येत नाही. सतत विविध विधाने करून चर्चेत राहणाऱ्या काँग्रेसच्या एका आमदाराने अशीच एक अजब इच्छा बोलून दाखवली आहे. मध्यप्रदेशमधील श्योपूरचे आमदार बाबू जंडेल यांनी नुकतीच, 'जनतेने माझी गाढवावर बसवून धिंड काढावी' असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. 

जंडेल यांनी म्हटले आहे की, 'धिंड काढून गावातील स्मशानभूमीत जाऊन माझी पूजा करावी.' आपल्या परिसरात पाऊस पडावा यासाठी ही युक्ती वापरता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या ग्वाल्हेर - चंबळ भागात कमी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे येथील प्रमुखाची गाढवावरून धिंड काढल्यास ही समस्या दूर होईल, असे त्यांना वाटते. 

MLA Babu Jandel
Ashok Chavan : 'वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच चांगली'; अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?

ज्या भागात पाऊस पडलेला नाही, अशा भागातील मुख्य व्यक्तीची गाढवावरून वाजत-गाजत धिंड काढल्यास इंद्रदेव प्रसन्न होतात. पाऊस पाडतात. हा उपाय याआधी वापरण्यात आला आहे. या भागातील आमदार म्हणून माझी धिंड काढल्यास पाऊस पडेल. याबद्दल आपण सोशल मीडियावरच वाचले आहे, असे जंडेल यांनी सांगितले. 

आपल्या अनेक विधानांमुळे आमदार जंडेल सातत्याने चर्चेत असतात. दोन वर्षांपूर्वी विधानसभेत पुराच्या मुद्द्यावरून त्यांनी कुर्ता फाडून आंदोलन केले होते. अनेकदा विजेच्या खांबावर चढून वीज पुरवठा सुरु केल्याच्या घटनांमुळेही ते चर्चेत राहिले आहेत. आता या नवीन विधानाने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.