Ambareesh Murty Journey : शून्यातून उभे केले 'पेपरफ्राय'चे साम्राज्य! असा होता अंबरीश मूर्ती यांचा प्रवास

Pepperfry Co-Founder : कंपनीचे दुसरे संस्थापक आशिष शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
PepperFry Co-Founder Ambareesh Murty
PepperFry Co-Founder Ambareesh MurtyeSakal
Updated on

देशातील अग्रगण्य ऑनलाईन फर्निचर शॉप असणाऱ्या 'पेपरफ्राय' कंपनीचे को-फाऊंडर अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे. कंपनीचे दुसरे संस्थापक आशिष शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. लेहमध्ये सोमवारी रात्री मूर्ती यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचं निधन झालं. (Pepperfry Co-Founder)

अंबरीश मूर्ती आणि आशिष शाह यांनी २०११ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. मूर्ती यांना मोटारसायकल रायडिंगची आवड होती. यापूर्वीही त्यांनी मुंबई ते लेह बाईक सवारी केली होती. ट्विटरवर (एक्स) बिझनेस जगतातून मोठ्या प्रमाणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

PepperFry Co-Founder Ambareesh Murty
अवघ्या 12 वर्षांच्या चिमुकलीसहित कार कोसळली तलावात; थरकाप उडवणारा Video Viral

"मला हे सांगताना अतिशय दुःख होत आहे, की माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ आणि सोलमेट अंबरीश मूर्ती (Ambareesh Murty) आता या जगात नाही. काल रात्री लेहमध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कृपया त्याच्यासाठी, आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना बळ मिळावं यासाठी प्रार्थना करा." अशा आशयाचं ट्विट आशिष शाह (Ashish Shah tweet) यांनी केलं आहे.

असा होता प्रवास

मूर्ती यांनी १९९६ साली कॅडबरी कंपनीत सेल्स अँड मार्केटिंग पदावर काम सुरू केलं होतं. याठिकाणी त्यांनी साडेपाच वर्षं काम केलं. त्यानंतर त्यांनी ICICI प्रुडेन्शिअल कंपनीत काम सुरू केलं. याठिकाणी ते मार्केटिंग अँड कस्टमर सर्व्हिसचे व्हीपी होते. दोन वर्षं याठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी काही महिने लेव्हीजमध्ये (Levi's) काम केलं.

PepperFry Co-Founder Ambareesh Murty
Heart Attack Symptoms : तुम्हाला सतत थकवा जाणवतोय का? सांभाळून रहा Heart Attack कधीही येऊ शकतो!

यानंतर त्यांनी ओरिजिन रिसोर्सेस या पोर्टलची स्थापना केली. भारतीय म्युच्युअल फंड कंपन्यांना मदत करणारं हे पोर्टल होतं. पुढे २००५ साली त्यांनी हे पोर्टल बंद केलं, आणि ब्रिटानिया कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर सात महिन्यांनी त्यांनी ईबे इंडिया कंपनी जॉईन केली. ते फिलिपिन्स, मलेशिया आणि भारत विभागाचे प्रमुख होते. (Who is Ambareesh Murty)

२०११ साली त्यांनी आशिष शाह यांच्यासोबत मिळून पेपरफ्राय कंपनीची स्थापना केली. फर्निचर आणि होम डेकोर वस्तू एकाच ठिकाणी मिळणारं हे ऑनलाईन स्टोअर आहे. मुंबईमध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअपने काही महिन्यांमध्येच 240 मिलियन डॉलर्सचा फंड उभारला होता. सध्या पेपरफ्राय ही देशातील अग्रगण्य फर्निचर विक्रेती कंपनी आहे.

PepperFry Co-Founder Ambareesh Murty
Heart Attack Research : हृदयविकाराच्या झटक्याबद्दल AI मॉडेल अचूक माहिती देऊ शकते, संशोधनात खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.