दारू-दारू करतच नको ते प्यायला अन्...

a person did not get alcohol due to the lockdown then the sanitizer drank
a person did not get alcohol due to the lockdown then the sanitizer drank
Updated on

कोची (केरळ): कोरोना व्हायरला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केल्यानंतर तळीरामांची पंचाईत झाली आहे. दारू मिळवण्यासाठी तळीराम नको-नको ते पराक्रम करताना दिसतात. एकाने तर दारू-दारू करतच प्राण सोडल्याची घटना घडली.

देशात लॉकडाऊन असल्यामुळे दारूची दुकाने बंद आहेत. यामुळे तळीरामांचे हाल होताना दिसत आहेत. दारू मिळवण्यासाठी काही तळीराम घरीच दारू बनवत आहेत तर काही जण दुकाने फोडत आहेत. कोची येथील कोयंबटूर मध्ये एक विचित्र घटना घडली. बर्नार्ड नावाच्या युवकाला खूप दारू पिण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे दारू विकण्यावर बंदी आली सगळी दुकाने बंद झाली. यामुळे त्याला दारू मिळाली नाही. दारू मिळत नसल्यामुळे तो बेचैन होत होता. दारू न मिळाल्यामुळे तो दारू-दारू करत सॅनिटायझर प्यायला. सॅनिटायझर प्यायल्याने बर्नार्डचा मृत्यू झाला आहे.

बर्नार्डच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, 'बर्नार्ड एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होता. तिथे सॅनिटायझर ठेवण्यासाठी देण्यात आले होते. दारूची सवय दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे त्याचं मानसिक आणि शारीरिक संतुलनही बिघडले होतं. दारू न मिळाल्यानं अखेर सॅनिटायझर प्यायला. बर्नाडला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृ्त्यू झाला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.