नवी दिल्ली- भारतीय जनता देशाच्या सरन्यायाधीशांचा प्रचंड आदर करत आली आहे. त्यातही काही सरन्यायाधीशांना लोकांकडून जास्त प्रेम मिळालंय. त्यात विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा समावेश होतो. डीवाय चंद्रचूड हे आपले निर्णय आणि वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. सरन्यायाधीशांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यास अनेकांना आवडेल. त्यात चंद्रचूड यांनीच लोकांना त्यांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी दिली आहे.
चंद्रचूड सकाळी कधी उठतात? ते व्हेज खातात की नॉन व्हेज? त्यांचा जवळचा मित्र कोण आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली आहेत. चंद्रचूड यांनी एनडीटीव्ही या वृतसंस्थेला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. (personal life of the Chief Justice dy Chandrachud fasting every Monday Know the special things about him)
डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं की, ते आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता करतात. सकाळी शांत वातावरण असते. अशा वातावरणात अनेक विषयांवर ते विचार करतात आणि योगा करतात. ते गेल्या २५ वर्षांपासून योगा करत आहेत.
डीवाय चंद्रचूड सगळ्यात चांगला मित्र म्हणून आपल्या पत्नीकडे पाहतात. त्यांच्या पत्नीचे नाव कल्पना दास आहे. ते म्हणाले की, मी पत्नीसोबत आयुर्वेदिक डायट घेतो. आम्ही दोघे शाकाहारी आहोत. आमची जीवनशैली जास्त करुन वनस्पतींवर आधारित आहे. मला वाटतं की आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या विचारांवर होत असतो. तुमची तंदुरुस्ती तुमच्या आतून येते. त्यासाठी तुमचा मेंदू, मन चांगलं ठेवायला हवं.
माझं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं नाहीये. आयुष्यात चढ-उतार येतात. मी पण आयुष्यात अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. या समस्यांमधून पुन्हा उभारी घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येत कठीण प्रसंगाचा एक उद्देश असतो. याची जाणीव आपल्याला पुढे होते.
चंद्रचूड यांनी सांगितलं की, ते दर सोमवारी उपवास ठेवतात. महाराष्ट्रामध्ये उपवासासाठी शाबुदाणा खिचडी खाल्ली जाते. मी राजगिरा खातो. गेल्या २५ वर्षांपासून मी सोमवारचा उपवास ठेवतोय. राजगिरा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ला जोते. हे एक खलके आणि चवदार खाद्य आहे.
तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर अर्ध्या अडचणी कमी होतील. पण, मी कधीकधी आईसक्रीम खातो, असं ते म्हणाले. चंद्रचूड यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये पदाचा कार्यभार स्वीकारला होतो. विशेष म्हणजे त्यांचे वडील वायवी चंद्रचूड हे भारतात सर्वाधिक काळ मुख्य न्यायाधीश पदी होते. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.