Petrol and Diesel Price : इंधनांच्या मागणीत लक्षणीय वाढ

विक्रीला वेग : कृषी, औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या उलाढालींचा परिणाम
Petrol and Diesel Price update Significant increase in demand for fuels agriculture energy delhi politics
Petrol and Diesel Price update Significant increase in demand for fuels agriculture energy delhi politicssakal
Updated on

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील वाढती मागणी तसेच सणासुदीच्या हंगामामुळे देशात नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. सप्टेंबरपासून इंधनांच्या विक्रीत दर महिन्याला वाढ झाली असून, जूननंतरची पेट्रोल आणि डिझेलची ही सर्वाधिक विक्री आहे. नोव्हेंबरमध्ये पेट्रोलची विक्री ११.७ टक्क्यांनी वाढून २.६६ दशलक्ष टन झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये ती २.३३ दशलक्ष टन होती. तर ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या सणाच्या हंगामामुळे मासिक आधारावर त्यात १.३ टक्के वाढ झाली. कोविड साथीच्या काळात नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत त्यात १०.७ टक्के, तर नोव्हेंबर २०१९च्या तुलनेत १६.२ टक्क्यांनी अधिक होती.

देशातील सर्वाधिक वापरले जाणारे इंधन डिझेलच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये २७.६ टक्के वाढ होऊन ७.३२ दशलक्ष टनांपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत १७.४ टक्के, तर २०१९ च्या तुलनेत ९.४ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२२ मधील ६.२५ दशलक्ष टन विक्रीच्या तुलनेत ते १७.१ टक्क्यांनी वाढले आहे. कोविड साथीनंतर जसजसे विमान वाहतूक क्षेत्र खुले झाले, तसतशी देशांतर्गत विमान वाहतूक कोविड-१९पूर्व पातळीजवळ आली. मात्र आंतरराष्ट्रीय वाहतूक काही देशांमधील निर्बंधांमुळे अद्याप कमी आहे. वाहतूक वाढीमुळे जेट इंधनाची मागणी वाढली आहे. ‘रब्बी पिकांच्या पेरणीमुळे आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाल्याने इंधनाच्या मागणीत वाढ झाली. सिंचनासाठी कृषी पंप आणि वाहतूकीसाठी ट्रकचा वाढलेला वापर यामुळे डिझेलची मागणी वाढली असून, ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामामुळे मागणीला चालना मिळाली. पावसाळा आणि मागणी कमी झाल्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये इंधनाची विक्री घटली होती. तसेच सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने वीजेवरील उपकरणांचा वापर वाढेल. देशभरातील औद्योगिक आणि व्यावसायिक घडामोडींमधील सुधारणामुंळे विजेचा वापर आणि मागणी आणखी वाढेल,’ असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मागणीतील वाढीची तुलनात्मक आकडेवारी

पेट्रोल :

नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत ११.७ टक्के वाढ (२०.६६ लाख टन)

नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत त्यात १०.७ टक्के

डिझेल :

नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत २७.६ टक्के वाढ (७०.३२ लाख टन)

नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत १७.४ टक्के वाढ

जेट इंधन :

नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत २१.५ टक्के वाढ (५७२,२०० टन)

नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत ६०.८ टक्के जास्त

एलपीजी :

नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत ७.८ टक्के वाढ (२०.५५ लाख टन)

नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत ८.४ टक्के वाढ

वीज :

नोव्हेंबर २०२१च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ (११२अब्ज युनिट)

नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत १६ टक्के वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()