Petrol-Diesel Price : दिल्ली-मुंबईत रेकॉर्डब्रेक दराने विक्री

भोपाळ हे भारतातील सर्वात जास्त दराने डिझेलची विक्री करणारे शहर ठरले आहे.
Petrol Price
Petrol PriceGoogle file photo
Updated on
Summary

राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत इंधन तेलांच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. देशातील अनेक भागात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले. गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत दररोज वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर दिसत असलेल्या इंधन दरात वाढ होऊ लागली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट असूनही तेल कंपन्या किंमती वाढवत आहेत. आज पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत इंधन तेलांच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. देशातील अनेक भागात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.

Petrol Price
आसाममध्ये १८ हत्तींचा मृत्यू; वीज कोसळल्याने घडली दुर्घटना

काय आहेत आजच्या किंमती

सकाळी ६ वाजता इंधन तेलांच्या किंमतीत बदल झाले. आज दिल्लीत पेट्रोल ९२.३४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ८२.९५ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. तर मुंबईत पेट्रोलची विक्रमी ९८.६५ रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. तर डिझेलने नव्वदी ओलांडली आहे. मुंबईत डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Petrol Price
दहशतवादी डॉक्टर म्हणतो मलाही कोरोनाकाळात मदत करायची आहे

देशातील चार महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या चेन्नईत आज पेट्रोल ९४.०९ तर डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रति लिटर झाली आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १००.३८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. भोपाळ हे भारतातील सर्वात जास्त दराने डिझेलची विक्री करणारे शहर ठरले आहे.

दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होतात. सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या दरांमध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींची भर पडताच त्याचे दर जवळपास दुप्पट होतात. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज बदल होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()