१५ एप्रिलला पेट्रोल १६ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १४ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले होते. तेव्हापासून, तेलाच्या किंमती स्थिर होत्या.
नवी दिल्ली : सलग १८ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या, पण देशभरातील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतीत वाढ झाल्याचे आज दिसून आले. सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) त्यांचे दर वाढविले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात १५ ते २० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमती (Petrol Price) वाढीमुळे मंगळवारी राजधानी दिल्ली (Delhi)मध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९०.५५ रुपयांवर पोहोचले, तर डिझेल (Diesel) प्रतिलिटर ८१ रुपयांच्या जवळपास पोचले आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. (Petrol and Diesel prices hiked after 18 days in India)
१८ दिवसांनंतर वाढले दर
यापूर्वी पेट्रोल आणि झेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. १५ एप्रिलला पेट्रोल १६ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १४ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले होते. तेव्हापासून, तेलाच्या किंमती स्थिर होत्या. पण १८ दिवसांनंतर आता किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
मेट्रो शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर)
दिल्ली - पेट्रोल - ९०.५५ रुपये, डिझेल - ८०.९१ रुपये
मुंबई - पेट्रोल - ९६.९५ रुपये, डिझेल - ८७.९८ रुपये
चेन्नई - पेट्रोल - ९२.५५ रुपये, डिझेल - ८५.९० रुपये
कोलकाता - पेट्रोल - ९०.७६ रुपये, डिझेल - ८३.७८ रुपये
दररोज बदलतात किंमती
दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. विदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर काय आहेत यावरून हे दर ठरवले जातात. तसेच यामध्ये अबकारी शुल्क (), डीलर कमिशन आणि इतर गोष्टी पकडल्यास त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.