...तर केंद्र सरकार बाजारात आणणार ‘फ्लेक्स इंधन’; किंमत 60 रुपये!

Petrol diesel
Petrol diesel Petrol diesel
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नागरिकांना दिवाळी गिफ्ट देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट केली आहे. यामुळे नागरिकांना थोडा का होईना दिलासा नक्कीच मिळाला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केल्याने हे शक्य झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे. आता सरकार एक पाऊल पुढे टाकत ‘फ्लेक्स इंधन’वर काम करण्याचा विचार करीत आहे. याची किंमत फक्त ६० रुपये प्रति लीटर राहण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे महागाई चांगल्यापैकी वाढली होती. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची कंबर मोडली होती. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १०० रुपयांपेक्षाही जास्त आहे. याचा सर्वच स्तरावरून होत असलेला विरोध पाहता मोदी सरकार खास योजनेवर काम करत आहे.

Petrol diesel
ती खोलीत गेली अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

मोदी सरकार सद्या ‘फ्लेक्स इंधन’वर काम करीत आहे. यामुळे नागरिकांची पेट्रोल आणि डिझेलपासून सुटका होईल सोबतच कमी किमतीत वाहन चालवण्याचा आनंद घेता येणार आहे. यात सरकारला यश आले तर एक लीटर ‘फ्लेक्स इंधना’साठी फक्त ६० रुपये मोजावे लागणार आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी फ्लेक्स इंधनाचा मसुदा तयार करण्यात व्यस्त आहेत. सरकार फ्लेक्स इंधन अनिवार्य करण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी मागे सांगितले होते.

काय आहे ‘फ्लेक्स इंधन’?

‘फ्लेक्स इंधन’ हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून बनवलेले पर्यायी इंधन आहे. याचे इंधन इंजीन पेट्रोल इंजिनसारखेच आहे. परंतु, काही अतिरिक्त घटकांसह ‘फ्लेक्स इंजीन एकापेक्षा जास्त इंधनावर चालू शकते. या इंजिनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते इलेक्ट्रिक वाहनापेक्षा कमी खर्चात बनवले जाते.

Petrol diesel
चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे यांना घेतले ताब्यात; काळी दिवाळी

१३ राज्य सरकारनेही कर कमी केले

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर १३ राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील करमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. १३ पैकी दहा भाजपशासित राज्य आहेत. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भाजपशासित राज्यांनी अतिरिक्त कपात जाहीर केली आहे. याशिवाय बिहार, ओडिशा आणि सिक्कीमनेही कर कमी करण्याचे सांगितले आहे.

या राज्यामध्ये पेट्रोल स्वस्त

  • गुजरात - पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रत्येकी ७ रुपयांनी कमी

  • ओडिशा -पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये प्रति लीटर तीन रुपयांनी कमी करण्याची घोषणा

  • बिहार - पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये प्रतिलीटर तीन रुपयांपेक्षा जास्त कपात करण्याची घोषणा

  • उत्तर प्रदेश - डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर प्रत्येकी १२ रुपयांनी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा

  • गोवा व कर्नाटक - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी सात रुपयांनी कपात करण्याचे आदेश जारी

  • उत्तराखंड - पेट्रोलवरील कर प्रति लीटर सात रुपयांनी कमी करण्याची घोषणा

  • हरयाणा - पेट्रोल आणि डिझेल १२ रुपयांनी स्वस्त

  • आसाम - पेट्रोल आणि डिझेलवरील कर ७ रुपयांनी कमी करण्याची घोषणा

  • त्रिपुरा - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सात रुपयांनी कपात

  • हिमाचल प्रदेश - कर कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे.

  • मणिपूर - पेट्रोल आणि डिझेलवरील कर सात रुपयांनी कमी

  • सिक्कीम - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर सात रुपयांनी कपात करण्याची घोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.