गगनाला भिडलेले पेट्रोलचे दर कमी करणे राज्यांच्याच हातात : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री

केंद्र सरकार दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पेट्रोल
पेट्रोल सकाळ
Updated on

नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांच्या (Petrol Price) वाढलेल्या दरांपासून दिलासा देणे ही राज्य सरकारांची जबाबदारी असून, राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट (VAT) कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी केले आहे. ते छत्तीसगडमधील महासमुंद येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. ( Hardeep Singh Puri On Petrol Rates)

पेट्रोल
प्रेम प्रकरण, अपहरण मारहाण अन् खून; मोशीतील घटनेने पोलीसही चक्रावले

ते म्हणाले की, केंद्र सरकारनेपेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र, आता केंद्राने याबाबतचा निर्णय राज्य सरकारांकडे सोडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "केंद्र सरकार दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते आणि राज्य सरकारांनाही तसे करण्यास सांगितले होते. भाजपशासित राज्यांनी डिझेल आणि पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.