प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्यावर; गाडीसाठी फायद्याचं कोणतं?

petrol premium rate high know diffrence normal petrol
petrol premium rate high know diffrence normal petrol
Updated on

नवी दिल्ली - देशातील पेट्रोल डिझेलचे दर भडकले असून काही ठिकाणी जवळपास 99 ते 100 रुपयांपर्यंत लिटरचे दर पोहोचले आहेत. यातच प्रीमियम पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून देशातील काही ठिकाणी 104 रुपयांपर्यंत लिटर दराने हे पेट्रोल विकले जात आहे. महाराष्ट्रातील परभणी आणि राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये क्स्टार प्रीमियमचं पेट्रोल 26 जानेवारीलाच 100 रुपयांच्या वर गेलं होतं. त्यानंतर आज सोमवारी 103 रुपये लिटर इतका दर झाला आहे. तर नॉर्मल पेट्रोल 99.49 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. पेट्रोलच्या दराची शंभरी कधीही पार होऊ शकते. दरम्यान, प्रीमियम पेट्रोलचे दर शंभरच्या वर गेल्यानं नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल यांच्यात काय वेगळं असतं? यामुळे फायदा काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

पेट्रोल पंपावर गेल्यानंतर नेहमी दोन प्रकारच्या पेट्रोलची सुविधा दिली जाते. कोणत्याही पेट्रोल पंपावर दोन प्रकारचं पेट्रोल हे असतंच. यामध्ये एक असतं साधं पट्रोल आणि दुसरं म्हणजे पॉवर फ्युएल. प्रत्येक पेट्रोलियम कंपनी पॉवर फ्युएलला वेगवेगळं नाव देते. हिंदुस्तान पेट्रोलियमने याला पॉवर पेट्रोल म्हटलं आहे तर भारत पेट्रोलियमने स्पीड, इंडियन ऑइलने एक्स्ट्रा प्रिमीयम असं नाव दिलं आहे. पॉवर फ्युएलची किंमत ही साध्या पेट्रोलपेक्षा जास्त असते. असं यामध्ये काय असतं की पेट्रोल जास्त दराने विकलं जातं आणि प्रत्येक कंपनीचं पेट्रोल वेगवेगळं असतं का?

नॉर्मल पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलमध्ये फरक
भारतात नॉर्मल पेट्रोल, प्रीमियम पेट्रोल आणि हाय ऑक्टेन पेट्रोल विकलं जातं. यातलं ऑक्टेन पेट्रोल हे खूप कमी ठिकाणी मिळतं. पेट्रोलचे तीन प्रकार हे त्यात असलेल्या ऑक्टेनच्या प्रमाणावरून केले जातात. प्रीमियम पेट्रोलमध्ये ऑक्टेनचं प्रमाण जास्त असतं. तर नॉर्मल पेट्रोलमध्ये ऑक्टेन 87 ते 89 यांच्या दरम्यान असतं. तर प्रीमियम पेट्रोलमध्ये ऑक्टेनची संख्या 91 ते 93 च्या दरम्यान असते. ऑक्टेन संख्या जास्त असल्यानं प्रीमियम पेट्रोलची संख्या दोन किंवा तीन रुपयांनी जास्त असते. 

ऑक्टेन फ्युएल काय असतं
हाय ऑक्टेनच्या पेट्रोलमुळे इंजिनमधील आवाज आणि डेटोनेटिंग कमी करते. इंजिनचा आवाज आणि डेटोनेटिंग  म्हणजे त्यात टक टक असं ऐकू येत असतं ते कमी होतं. यामुळे इंजिन - नॉकिंग आणि डेटोनेटिंग यामुळे इंजिनच्या लाइफवर परिणाम होतो. हाय ऑक्टेन पेट्रोल त्या वाहनांसाठी योग्य असतं ज्यामध्ये हाय कम्प्रेशन सिस्टिम असते. इम्पोर्टेड वाहनांमध्ये ही सिस्टिम असते. पॉवर पेट्रोलमुळे इंजिनचे नॉकिंग कमी होते आणि ते होण्यापासून रोखते. इंजिन पूर्ण क्षमतेनं काम करण्यासाठी मदत होते. 

पॉवर फ्युएलचे फायदे
पॉवर फ्युएलमुळे इंजिनमधील फ्युएल इंजेक्टरच्या इंटेक वॉल्ववर जमा झालेला कचरा काढते. इंजिनची ताकद वाढवते त्यामुळे जास्त क्षमतेनं काम करते. यामुळे वायूंचे उत्सर्जन कमी होते. इनटेक वॉल्ववर काहीही जमा होण्यापासून पॉवर फ्युएल रोखते. 

कोणतं पेट्रोल फायद्याचं
नॉर्मल पेट्रोल पेक्षा पॉवर पेट्रोल नक्कीच फायद्याचं ठरेल. इंजिनसाठी याचा फायदा असल्यानं पॉवर पेट्रोल याबाबतीत उजवं ठरतं. विशेषत: जास्त सीसीचे इंजिन असलेल्या वाहनांसाठी याचा वापर उपयुक्त ठरतो. मात्र रेग्युलर बाइकमध्ये नॉर्मल पेट्रोलचा वापर करता येऊ शकतो. तुम्ही गाडी वेगाने चालवत नसाल, हायवेला जात नसाल तर नॉर्मल पेट्रोल वापरू शकता. तुम्ही रेसिंगचे चाहते असाल आणि इंजिनच्या हाय प्रेशरचा वापर करत असाल तर पॉवर फ्यूएल फायद्याचं ठरेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.