Bank Offer : वाढत्या किमतींपासून दिलासा! ग्राहकांना मिळणार 68 लिटर मोफत पेट्रोल अन् डिझेल

वाढत्या इंधनाच्या दरांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
petrol pump
petrol pumppetrol pump
Updated on

Indian Oil Citi Credit Card : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चक्क ग्राहकांना 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळण्याची संधी आहे.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

petrol pump
धन की बात : डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची वाढती मागणी

वर्षाला मिळणार 68 लीटर इंधन मोफत

वर्षाला 68 लीटर पेट्रोल आणि डिझेलची ही ऑफर इंडियल ऑईल सिटी क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी आहे. या कार्डच्या माध्यामातून यूजर वर्षाला 68 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत मिळवू शकतो. इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डचे हे इंधन क्रेडिट कार्ड आहे. कार्ड स्वॅप केल्यानंतर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) रिडीम करून ग्राहक दरवर्षी 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतील.

petrol pump
जगाच्या तुलनेत महागाई कमीच; चंद्रशेखर बावनकुळे

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये

1. इंडियन ऑइल पंपांवर टर्बो पॉइंट्सची पूर्तता करून दरवर्षी ग्राहक 68 लीटर पर्यंत मोफत इंधन मिळवू शकतो.

2. इंडियन ऑइल पंपांवर 1% इंधन अधिभारदेखील माफ केला जातो.

3. इंडियन ऑइल पंप्सवर खर्च केलेल्या 150 रुपयांवर प्रति 4 टर्बो पॉइंट मिळवता येऊ शकतात.

4. कार्डद्वारे किराणामाल आणि सुपरमार्केटमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक रु. 150 साठी 2 टर्बो पॉइंट्स मिळवता येऊ शकतात.

5. कार्डद्वारे इतर गोष्टींवर खर्च केलेल्या प्रत्येक रु. 150 वर 1 टर्बो पॉइंट मिळतो.

petrol pump
पेट्रोल-डिझेल वाचविण्याचा ‘स्टंट’ ठरतोय जीवघेणा !

कसे रिव्हर्ड कराल टर्बो पॉइंट्स

टर्बो पॉइंट्सची अनेक प्रकारे रिव्हर्ड करता येऊ शकतील. परंतु हे पॉईंट्स इंडियन ऑइल पंपांवर रिडीम केल्याने अधिक फायदे मिळू शकतात. इंडियन ऑइल पंप्सवर रिडेम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = रु. 1, MakeMyTrip, EaseMyTrip, IndiGo, goibibo, IndiGo, Premiermiles.co.in आणि Yatra.com- 1 टर्बो पॉइंट = 25 पैसे, BookMyShow एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि शॉपर स्टॉपवर रिडिमचा रेट 1 टर्बो पॉइंट = 30 पैसे इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.