पाच राज्यातील निवडणुकानंतर पेट्रोलचे दर भडकणार?

वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
petrol rate
petrol rateSakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील विधानसभांचा धुराळा पार पडल्यानंतर पेट्रोलचे दर 125 रुपये प्रति लीटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून, पाच राज्यातील निवडणुकांनंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. ( Petrol Diesel Prices Go Up After Elections)

petrol rate
राहुल बजाज यांच्या नावावरून नाराज होत्या इंदिरा गांधी, वाचा काय होते कारण

कच्च्या तेलाच्या (Crude Oli) दरात वर्षभरात 56 टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 95 डॉलरवर पोहचले आहेत. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतिन युक्रेवर (Russia-Ukraine) येत्या काही दिवसात हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात असा दावा, व्हाइट हाऊस (White House) कडून करण्यात येत आहे. त्यात अमेरिका दबाब तंत्राचा वापर करत असल्याने तेलाच्या किमती देखील वधारत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अशातच जर पेट्रोल आणि डिझेलची बाव वाढ झालीच तर, जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींवरदेखील परिणाम होईल.

petrol rate
ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर: नितीन गडकरी

आरबीआयकडून (RBI) देखील जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महागाईचा दर देखील 5.7 टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कच्च्या तेलामध्ये 1 डॉलर दर वाढल्यास आयातीवरील 6 ते 8 हजार कोटींनी खर्च वाढतो. त्यामुळे दोन लाख कोटींचा जास्तीचा बोजा केंद्रावर पडेल, अतिरिक्त बोजा वसूल करण्यासाठी पेट्रोल डिझेलचे दर वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()