महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ

महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या इंधनदरवाढीचा भडका सामान्यांना होरपळून टाकतो आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असतानाच दुसरीकडे एलपीजी सिलिंडरचे भाव देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जनसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याचं प्रमाणा सातत्याने वाढतानाच दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर पुन्हा एकदा वाढवला आहे. आता विना-अनुदानित 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी दिल्लीमध्ये 899.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तब्बल 15 रुपयांनी वाढ करण्यात आली असून हे 5 किलोच्या सिलिंडरसाठी आता 502 रुपये मोजावे लागणार आहेत. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत.

महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ
पुन्हा इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत डिझेल शंभरीजवळ

गेल्या १ ऑक्टोबरपासून कमिर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांनी वाढ केली होती. त्यावेळी तब्बल 43 रुपयांनी दर वाढवण्यात आले होते. 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची दिल्लीतील किंमत नव्या दरवाढीनंतर 1736.50 रुपये झाली आहे. याआधी 1 सप्टेंबर रोजी 75 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती.

महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ
आम्ही प्रियांका गांधींच्या पाठीशी; शिवसेनेचे भाजपवर कोरडे आसूड

दुसरीकडे, लागोपाठ दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. बुधवारी देशभरात पेट्रोल प्रतिलीटर 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. आधीच कोरोना महामारीने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांपुढे संकट निर्माण झालं आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलच्या दर घसरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही राज्यात पेट्रोलने शंभरीपार केली आहे. 24 सप्टेंबरपासून देशात प्रतिलीटर डिझेल 2.80 रुपयांने तर पेट्रोल 1.80 रुपयांने वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.