PFI बंदीनंतर 'या' राजकीय पक्षावर कारवाई होणार? SDPI निवडणूक आयोगाच्या रडारवर

मोदी सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे.
Popular Front of India
Popular Front of Indiaesakal
Updated on
Summary

मोदी सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारनं (Modi Government) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या इस्लामिक संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी प्रथम अनेक ठिकाणी छापे टाकून या संस्थेविरुद्ध पुरावे गोळा केले आणि त्यानंतर गृह मंत्रालयानं याप्रकरणी कठोर कारवाई केली.

PFI व्यतिरिक्त गृह मंत्रालयानं इतर 9 संलग्न संघटनांना देखील बेकायदेशीर म्हटलंय. परंतु, संघटनेशी संबंधित SDPI या राजकीय पक्षावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीय. दंगल भडकवणं आणि देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून PFI विरुद्ध कठोर कारवाई करण्यात आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे, SDPI म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियावर (Social Democratic Party of India) कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीय. याचं कारण ही राजकीय संघटना नोंदणीकृत असून आतापर्यंत संघटनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय मान्यता मिळाल्याचं मानलं जात आहे.

Popular Front of India
Drone Strike : इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणनं डागलं क्षेपणास्त्र; हल्ल्यात 13 ठार, 58 जण जखमी

..तर निवडणूक आयोग कारवाई करू शकतं

माहितीनुसार, गृह मंत्रालय SDPI वर कारवाईसाठी निवडणूक आयोगाला शिफारस करू शकतं. शिवाय, गृह मंत्रालयाच्या आधारे निवडणूक आयोगही (Election Commission) या पक्षावर बंदी घालू शकतं. SDPI आधीच निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे. कारण, पक्षाच्या देणग्यांशी संबंधित माहितीवर प्रश्न उपस्थितीत असून आयोगानं यासंदर्भात पक्षाला सतत सवाल विचारले आहेत.

Popular Front of India
RSS ला शिव्या देऊन काँग्रेस आपली पापं धुवू शकत नाही; PFI बंदीवरुन संघाचं प्रत्युत्तर

देणग्यांबाबत आयोगाला माहितीच दिली नाही

SDPI नं 2018-19 आणि 2019-20 च्या देणग्यांबाबत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी पक्षानं सांगितलं की, या दोन वर्षांत 20 हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे. मात्र, पक्षाच्या खात्यात 5 कोटी 4 लाखांची रक्कम दाखवण्यात आलीय. अशा स्थितीत केंद्रीय तपास यंत्रणा निधीबाबत पक्षावर कारवाई करू शकतं. शिवाय, 2020-21 मध्ये पक्षाला 2.9 कोटी रुपयांची देणगी दिली होती. परंतु, पक्षाचे पदाधिकारी केवळ 22 लाख रुपयांची माहिती देऊ शकले. देणगीदार कोण आहेत हेही पक्षानं जाहीर केलेलं नाही. या प्रकरणात असं आढळून आलंय की, एसडीपीआयनं तीन वर्षांत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून 11.78 कोटी रुपये जमा केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.