'हिंदूंनी त्यांच्या अंत्यविधीसाठी भात ठेवला पाहिजे, तर ख्रिश्चनांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी धूप ठेवावा.'
केरळ पॉप्युलर फ्रंटचे (PFI) नेते याहिया तांगल (Yahya Thangal) यांनी उच्च न्यायालयाच्या (Kerala High Court) न्यायाधीशांविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केलीय. न्यायाधीशांचं अंतर्वस्त्र भगवं असल्याचं तांगल यांनी म्हटलंय. अलाप्पुझातील रॅलीत तांगल म्हणाले, 'न्यायालयांना आता धक्का बसलाय. आमच्या अलाप्पुझा रॅलीतील (Alappuzha Rally) घोषणा ऐकून उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही हैराण झालेत. तुम्हाला त्याचं कारण माहितीय का? त्याचं कारण म्हणजे, त्यांचा आतील पोशाख भगवा आहे', अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केलीय.
व्हायरल व्हिडिओमध्ये अलाप्पुझामधील पीएफआयच्या रॅलीत एक मुलगा 'हिंदूंनी त्यांच्या अंत्यविधीसाठी भात ठेवला पाहिजे, तर ख्रिश्चनांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी धूप ठेवावा', अशी घोषणाबाजी करताना दिसला. जर तुम्ही सभ्यपणे जगलात तर तुम्ही आमच्या देशात राहू शकता आणि जर तुम्ही सभ्यपणे जगला नाही, तर आम्हाला स्वातंत्र्य माहितीय. त्यामुळं दयाळूपणे, शांततेनं जगा.'
केरळात राहणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन लोकसंख्येसाठी थेट धोका म्हणून पाहिलं जातंय. जर ते एका रांगेत आले नाहीत, तर त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल, असा इशारा पीएफआयनं दिला होता. केरळ पोलिसांनी शुक्रवारी पीएफआयच्या घोषणाबाजी प्रकरणी आणखी 18 जणांना अटक केलीय.
केरळ उच्च न्यायालयानं अलाप्पुझातील 21 मे'च्या रॅली संदर्भात प्रक्षोभक घोषणा दिल्याबद्दल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (Popular Front of India) योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तत्पूर्वी, पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष सीपी मुहम्मद बशीर यांनी मंगळवारी सांगितलं की, ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात आहे. आमचा पक्ष संघाच्या दहशतवादाशी लढा आणि विरोध करत राहील, असा त्यांनी इशारा दिलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.