'फायझर'चे कोविड औषध घटक बायोफोर इंडिया कडून विकसित

भारतीय उत्पादकांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी होण्याची आशा आहे.
फायझर
फायझरSakal
Updated on

मुंबई : अमेरिकन एफडीएने (FDA) कोरोनावरील उपचारांसाठी मंजूरी दिलेल्या पॅक्सलोविड (Paxlovid) मधील एक अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या निर्मात्रेल्वीर विकसित केल्याची घोषणा बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सने केली आहे. रक्षित ग्रुपच्या सहकार्याने हे उत्पादन केले जात आहे. (Pfizer Medicine)

यामुळे भारतीय उत्पादकांसाठी परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने चीनकडून हे सध्या खरेदी केले जाते. बायोफोर यूएस एफडीए अनुरूप सुविधेमध्ये निर्मात्रेल्वीरचे उत्पादन देखील करत आहे. तसेच लवकरच डीसीजीआयकडे मंजुरीसाठी दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

पॅक्सलोविडला यूएस एफडीएद्वारे डिसेंबर २०२१ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. प्रौढ आणि बालरोग रूग्णांमध्ये तसेच उच्च धोका असलेल्या रुग्णांवरील सौम्य ते मध्यम कोव्हीड-१९ च्या उपचारांसाठी प्रमाणित केले आहे. ही पहिली मौखिक गोळी होती जी यूएस एफडीएने मंजूर केली आहे. त्यापूर्वीच्या मंजूर मौखिक उपचारांपेक्षा यामध्ये अधिक चांगली सुरक्षा प्रोफाइल आहे. हे निर्मात्रेल्वीर आणि रिटोनावीर टॅब्लेटच्या सह-पॅकमध्ये उपलब्ध आहे.

फायझर
मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगारांची पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून धरपकड

बायफोरचे सीईओ डॉ. जगदीश बाबू रंगीसेट्टी म्हणाले की, “या इंटरमीडिएट्सचा विकास आणि निर्मिती अत्यंत क्लिष्ट आहे. कोविडसाठी सूचित केलेल्या पूर्वीच्या अँटीव्हायरलपेक्षा लक्षणियरीत्या आव्हानात्मक आहे. आम्ही मूलभूत कच्च्या मालापासून या उत्पादनासाठी आवश्यक असणारे मध्यवर्ती घटक विकसित केले आहेत.

भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेसाठी अनेक टनांच्या प्रमाणात उच्च व्हॉल्यूमचे उत्पादन करण्याची आमची क्षमता आहे. जेव्हा उत्पादनाला भारतात मान्यता मिळेल तेव्हा भारतीय उत्पादक भारतातूनच हे घटक मिळविण्यासाठी सक्षम व स्वावलंबी असतील. आयातीवर अवलंबून न राहता गुणवत्ता आणि पुरवठ्याच्या नियंत्रणाच्या दृष्टीने अवघड असणार नाही.

रक्षित ग्रुपचे अध्यक्ष श्री रामेश्वर राव चंदना यांनी सांगितले की, “रक्षित ग्रुपची उपकंपनी, सायनोर लॅबोरेटरीज ही भारतातील लिथियम एचएमडीएसची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. ज्याची क्षमता दरमहा ५०० मेट्रिक टन आहे. तिच्याकडे क्रायोजेनिक प्रतिक्रिया हाताळण्याची सुविधा आहे. या इंटरमीडिएट्सच्या निर्मितीसाठी अत्यंत तापमान आणि मोठ्या प्रमाणात लिथियम अभिकर्मकांची आवश्यकता असते.

आमच्याकडे असलेल्या पायाभूत सुविधांमुळे, आम्ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत. बायोफोर सारख्या मजबूत भागीदारासह, आम्हाला विश्वास आहे की ही उत्पादने लवकर बाजारात आणण्यासाठी ही एक योग्य समन्वय आहे”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.