25 लाखाची लॉटरी? PM मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाने व्हायरल होतोय मेसेज

PM मोदी आणि अमिताभ बच्चनच्या नावाने मॅसेज व्हायरल होतोय, वाचा काय आहे प्रकरण.
PIB Fact Check
PIB Fact Checksakal
Updated on

अनेकदा सरकारच्या नावाने वेगवेगळ्या योजनेचे मॅसेजेस व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेजने धुमाकूळ घातलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करत 25 लाखाची लॉटरी मिळवा असा मेसेज व्हायरल होतोय. पीआयबीने यावर फॅक्ट चेक करत हा मॅसेज खोटा असल्याचा दावा केलाय. (PIB fact check message viral of lottery using name of pm narendra modi and amitabh bacchan)

PIB Fact Check
जातीनिहाय जनगणनेला विरोध नाही पण...

पीआयबीने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाचा वापर करून 25 लाखाच्या लॉटरीचं खोटं आमिष दाखवलं जात आहे. सोबतच पीआयबीने याबाबत आणि अशा मेसेजेस पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

PIB फॅक्ट चेकने ट्वीट करत भारत सरकारचा याच्याशी संबंध नसल्याचा दावा केलाय. अशा प्रकारच्या लॉटरी एक प्रकारचा स्कॅम असतात. असेही पीआयबीने सांगितले. तसेच कॉल, मेल, मेसेज वर कोणतीही खाजगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.