नवी दिल्ली : सिगारेट ओढण्याची वयोमर्यादा वाढवण्यात यावी तसेच स्मोकिंग झोनमध्ये बदल करण्यात यावेत आणि सुट्या सिगारेट विकण्यावर बंदी घालावी या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित वकील अॅड. सुभम अवस्थी यांनी ही याचिका दाखल केली आहे. (PIL in SC seeks to raise smoking age ban loose cigarettes sale)
याचिकेत म्हटलं की, एअरपोर्ट्स, क्लब, रेस्तराँ, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणं तसेच अशा खासगी मालमत्ता ज्या व्यावसायिक कार्यांसाठी वापरल्या जातात, अशा ठिकाणीची खास सिगोरेट ओढण्यासाठी जाहीर केलेले झोन्स बंद करावेत. यामुळं जे धुम्रपान करत नाहीत, त्यांना या त्रासापासून रोखता येईल. त्याचबरोबर सिगारेट ओढण्याचं वय १८ वर्षांवरुन २१ वर्षे करण्यात यावं, अशी मागणीही या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. अॅड. अवस्थी आपल्या याचिकेतून कोर्टाला सांगू इच्छितात की, सिगारेटची विक्री आणि त्याचं व्यसन यांमुळं नागरिकांच्या आरोग्याच्या हक्काचं उल्लंघन होतंय. तसेच खुली धुम्रपानाची ठिकाणं जसं एअरपोर्ट्स, रेस्तराँ आणि क्लबमधील ही ठिकाणं इतरांना धुम्रपानासाठी प्रेरित करतात.
सन २०१८ मध्ये जागतीक आरोग्य संघटनेनं भारतातील तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनावर भाष्य करताना तरुण मुलांमध्ये कार्डिओ-व्हॅस्क्युलर आजार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. हे आजार बळावण्यात सिगारेट महत्वाची भूमिका बजावते. सिगारेटमुळं भारतात ९ मिलियन लोकांचा मृत्यू झाला आहे हे मृत्यू ९.५ टक्के इतके आहेत. भारतात गेल्या दोन दशकात धुम्रपानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. त्यामुळं भारत १६ ते ६४ वयोगटात धुम्रपान करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याचबरोबर निकोटिन आणि तंबाखूबाबतच्या एका शोधपत्रिकेनुसार, सेकन्ड हँड धुम्रपानाच्या सवयीमुळं गंभीर प्रमाणात आर्थिक ओझं निर्माण होण्याचा इशारा दिला आहे, असंही या जनहित याचिकेतून निदर्शनास आणून दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.