Survey : धक्कादायक! चालू विमानात 66 टक्के पायलट झोपतात

Sleeping Pilot
Sleeping PilotSakal
Updated on

नवी दिल्ली : आपण विमानातून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. आपण प्रवास करत असताना पायलट झोपी गेल्याचं आपल्याला समजलं तर काय होईल? हा विचार करूनच आपल्या अंगावर काटा येईल पण हा गंमतीचा विषय नाहीये कारण जवळपास ६६ टक्के वैमानिक प्रवासादरम्यान विमान चालू असताना झोपत असल्याचं समोर आलं आहे.

(Pilot sleeping During Travel)

Sleeping Pilot
पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; फडणवीस म्हणाले, घोषणा देणाऱ्यांना...

आपण प्रवास करत असलेल्या विमानातील जवळपास ६६ टक्के पायलट विमान चालू असताना विमानाच्या कॉकपीठमध्ये झोपत असतात अशी धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर काही वैमानिकांनी आपण झोपत नसल्याचं सांगितलं आहे. सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन नावाच्या संस्थेने हे सर्वेक्षण केलं असून यामधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Sleeping Pilot
अवघ्या दोन वर्षाचा चिमुकला देतोय 'भारत माझा देश'चे धडे; पाहा Viral Video

विमान चालू असताना जवळपास ५४ टक्के वैमानिकांना अधिक तीव्र झोप येते तर ४१ टक्के वैमानिकांना मध्यम स्वरूपाची झोप येत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. सतत आणि अधिकच्या कामामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा येतो आणि त्यामुळे वैमानिकांना झोप येण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचं यातून समोर आलं आहे.

दरम्यान, अशा घटनामुळे अनेक विमान अपघात झाल्याचं समोर आलं आहे. २०१० मध्ये मंगळूर येथे झालेल्या विमान अपघातामध्ये जवळपास १५८ लोकांचा मृत्यू झाला होता. अपघात झालेल्या विमानाचा पायलट हा जवळपास पावणेदोन तास झोपला होता असं नंतर झालेल्या चौकशीतून समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.