Aam Aadmi Party : ‘आप’ला कार्यालयासाठी दिल्लीत जागा

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने अखेर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय कार्यालयासाठी दिल्लीत जागा दिली आहे. रविशंकर शुक्ला लेनमधील बंगला क्रमांक १ हा यापुढील काळात ‘आप’चे कार्यालय म्हणून ओळखले जाणार आहे.
Aam Aadmi Party
Aam Aadmi Partysakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने अखेर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय कार्यालयासाठी दिल्लीत जागा दिली आहे. रविशंकर शुक्ला लेनमधील बंगला क्रमांक १ हा यापुढील काळात ‘आप’चे कार्यालय म्हणून ओळखले जाणार आहे.

राउज अव्हेन्यू येथील राष्ट्रीय कार्यालय रिकामे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ''आप'' ला १० ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर दुसरीकडे ‘आप’ ला कार्यालयासाठी नवीन जागा देण्याकरिता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गुरुवार पर्यंतची वेळ दिली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने ''आप'' ला कार्यालयासाठी जागा वाटप केले आहे. राउज अव्हेन्यू येथील ''आप'' च्या विद्यमान कार्यालयाची जागा दिल्ली उच्च न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी राखीव ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही जागा रिकामी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ''आप'' ला दिले होते.

राष्ट्रीय कार्यालयासाठी जागा देण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून करण्यात आला होता. १० ऑगस्टपर्यंत राउज अव्हेन्यू येथील जागा सोडावयाची असल्याने लवकरच नव्या जागेत राष्ट्रीय कार्यालय हलविले जाणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.