Rajasthan Politics: काँग्रेस छूमंतर 19 जिल्ह्यांचा डाव अयशस्वी! गेहलोत सरकारमधले १७ मंत्री का झाले पराभूत?

राजस्थानातील सत्ताबदलाची परंपरा याखेपेसही कायम राहिलं आहे, राजस्थानमध्ये काँग्रेस छूमंतर होण्याची काय आहेत कारणे?
Rajasthan Politics
Rajasthan PoliticsEsakal
Updated on

बड्या नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष, प्रस्थापितविरोधी लाट, थेट राज्य सरकारवरच झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, पेपरफुटी आणि धार्मिक दंगलींमुळे आधीच कोंडीत सापडलेल्या काँग्रेसला राजस्थानात अपेक्षेप्रमाणे मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. जादूगार गेहलोत हे छूमंतर झाले असून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.(Latest Marathi News)

टीम गेहलोतमधील बहुतांश मंत्र्यांचा पराभव झाला असून राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या सभांचाही राज्यात फारसा प्रभाव पडला नसल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून येते. दुसरीकडे हिंदुत्वाचे कार्ड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला झंझावाती प्रचार भाजपच्या कामी आला असून त्याचबळावर त्यांनी राजस्थानवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. राजस्थानातील सत्ताबदलाची परंपरा याखेपेसही कायम राहिली.  (Marathi Tajya Batmya)

मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानात देखील भारत आदिवासी पार्टीचा प्रभाव पाहायला मिळाला. या पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रस्थापितविरोधी लाटेवर स्वार होत भाजपने ध्रुवीकरणाच्या शस्त्राचा मोठ्या खुबीने वापर केल्याने सगळेच चित्रच बदलले. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अवघी यंत्रणाच भाजपसाठी राबत होती. संघशक्तीच्या बळावर अनेक मोठ्या मतदारसंघांत भाजपला बाजी मारता आली.

पिंकसिटी जयपूरमध्ये भाजपचाच दबदबा पाहायला मिळाला. जयपूर ग्रामीणमधून विद्यमान खासदार आणि भाजपचे नेते राज्यवर्धनसिंह राठोड हे विजयी झाले आहेत. प्रत्यक्ष जयपूर विभागातील बारा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे केवळ सात उमेदवार विजयी झाले आहेत. (Latest Marathi News)

जयपूर शहरातील सांगानेर (भजनलाल शर्मा, भाजप), सिव्हिल लाइन्स (गोपाल शर्मा, भाजप), विद्याधरनगर (दियाकुमारी, भाजप), किशनपोल (अमीन कागजी, काँग्रेस) आणि हवामहल येथून (बालमुकुंद आचार्य, भाजप) हे विजयी झाले आहेत. हे शहरातील महत्त्वाचे मतदारसंघ मानले जातात.

Rajasthan Politics
PM Modi: 'मोदी का जादू चल गया', जिंकलेल्या राज्यात PM मोदींनी कसा केला होता निवडणुकीचा प्लॅन?

पायलट फॅक्टरचा प्रभाव

काँग्रेसने सचिन पायलट यांना बाजूला केल्याचा मोठा फटका पक्षाला बसल्याचे दिसते. गुर्जरबहुल पूर्व राजस्थानात अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने २०१८ मध्ये पायलट यांना मुख्यमंत्रिपद नाकारल्याने गुर्जर समुदाय नाराज झाला होता. पायलट गटाने २०२० मध्ये बंडाचे निशाण रोवल्यानंतर गेहलोत यांचे सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण त्यानंतर पायलट यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले होते.  (Marathi Tajya Batmya)

पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे गुर्जर मतदार नाराज झाला होता. पश्चिम राजस्थानातील जैसलमेर, बिकानेर आणि बारमेर या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी कधीकाळी काँग्रेसचा वरचष्मा होता त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकले आहेत.

Rajasthan Politics
Chhattisgarh Election: काँग्रेसला महादेव ‘ॲप’ प्रकरण भोवलं; छत्तीसगडमध्ये अशी झाली भाजपची घरवापसी

मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार

राजस्थानात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या स्पर्धेमध्ये वसुंधराराजे यांचे नाव आघाडीवर असलेतरीसुद्धा केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, प्रदेशाध्यक्ष अर्जुनराम मेघवाल, सी.पी.जोशी आणि दियाकुमारी यांच्या नावांचीही चर्चा आहे. भाजपश्रेष्ठींकडून ऐनवेळी महंत बालकनाथ यांचे नाव पुढे केले जाऊ शकते, असे बोलले जाते. मेघवाल हे अनुसूचित जातींचे नेतृत्व करतात तर बालकनाथ हे यादव समुदायाचे नेते आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

बालकनाथही जिंकले

योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभेमुळे चर्चेत आलेले भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ हे तिजारा मतदारसंघातून विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या इमरान खान यांचा सात हजार मतांनी पराभव केला आहे. त्याआधीच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे (बसप) संदीपकुमार हे विजयी झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सी.पी. जोशी हे नाथद्वारमधून पराभूत झाले.(Latest Marathi News)

Rajasthan Politics
CM Post: निवडणूक मोदींच्या नावाने लढवली आता मुख्यमंत्री कोण? भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात?

राजघराण्याची सरशी

या निवडणुकीत राजस्थानातील राजघराण्यांची सरशी झाली असून स्थानिक जनता आजही त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसून आले. जयपूर राजघराण्याच्या दियाकुमारी या विद्याधरनगरमधून विजयी झाल्या असून वसुंधराराजे यांनी झालारपाटनचा पारंपरिक गड कायम राखला आहे. मिलेनियर महाराणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धीकुमारी या पूर्व बिकानेरमधून विजयी झाल्या आहेत.  (Marathi Tajya Batmya)

दियाकुमारी यांनी काँग्रेसच्या सीताराम अग्रवाल यांचा ७१ हजार ३६८ मतांनी पराभव केला. त्यांना १ लाख ५८ हजार ५१६ एवढी मते मिळाली आहेत. वसुंधराराजे यांनी झालारपाटनचा बालेकिल्ला कायम ठेवला आहे. येथून त्यांना तब्बल १ लाख ३८ हजार ८३१ मते मिळाली आहेत. भाजपने आक्रमक हिंदुत्वाबरोबरच जातींचे कार्ड पुढे करत त्या- त्या समुदायातील बाहुबली नेत्यांना उमेदवारी देऊ केली होती.

यात भाजपची भिस्त प्रामुख्याने मीना समाजाच्या मतांवर होती. या खेळीला यश आले आहे. सवाई माधोपूरमधून खा. किरोडीलाल मीना, गंगापूरसिटीतून रामकेश मीना आणि बामनवास येथून इंदिरा मीना या विजयी झाल्या आहेत.

गेहलोत सरकारमधील सतरा मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले असून त्यात बी.डी.कल्ला, परसादी लाल, ममता भूपेश, प्रतापसिंह खाचरियावास, राजेंद्र यादव, अर्जुन बामनिया, भंवरसिंह भाटी, जाहिदा खान, शकुंतला रावत आदींचा समावेश आहे. खुद्द गेहलोत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील २५ मंत्र्यांनी ही निवडणूक लढविली होती.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी खेळलेला १९ नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा डाव देखील अपयशी ठरल्याचे दिसून येते. कारण या जिल्ह्यांतील ५० मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या राजवटीत रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांचाही फटका या पक्षाला बसल्याचे बोलले जाते. यामुळेच अनेक नेत्यांनी पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर सोडचिठ्ठी दिली होती. सवर्ण मतपेढी ही पूर्णपणे भाजपच्या बाजूने उभी राहिल्याने काँग्रेसला फटका बसला.

मोदींमुळेच विजय

राजस्थानात पंतप्रधान मोदी हेच पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. जयपूरमधील मोदींच्या रोडशोनंतर सगळे वातावरणच बदलून गेले होते. मोदींच्या प्रतिमेचा पक्षाला शहरी भागामध्ये मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे भाजपने इथे कोणत्याही एका नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले नव्हते. पण वसुंधराराजेंनी आक्रमक प्रचार केला होता. राजेंच्या प्रतिमेचाही पक्षाला फायदा झाला.

प्रमुख विजयी

अशोक गेहलोत : काँग्रेस

सचिन पायलट : काँग्रेस

दियाकुमारी : भाजप

वसुंधराराजे : भाजप

राज्यवर्धनसिंह राठोड : भाजप

बाबा बालकनाथ : भाजप

बालमुकुंदाचार्य : भाजप

Rajasthan Politics
PM Modi: 'मोदी का जादू चल गया', जिंकलेल्या राज्यात PM मोदींनी कसा केला होता निवडणुकीचा प्लॅन?

प्रमुख पराभूत

सतीश पुनिया : भाजप

सी. पी. जोशी : काँग्रेस

प्रतापसिंह खाचरियावास : काँग्रेस

गोविंदराम मेघवाल : काँग्रेस

रमेश मीना : काँग्रेस

सुखराम बिश्नोई : काँग्रेस

भजनलाल जाटव : काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.