सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परीक्षेबाबत याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे.
नवी दिल्ली- सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परीक्षेबाबत याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. पुढील सुवालणी 31 मे म्हणजे सोमवारी होणार आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांची बँच सुनावणी करणार आहे. अॅडव्होकेट ममता शर्मा यांनी कोर्टात जनहीत याचिका दाखल केली होती. (Plea To Cancel CBSE ICSE Class 12 Exams Supreme Court Adjourns Hearing To May 31)
याचिकाकर्त्याने स्टँडिंग कॉन्सिलला यासंबंधिची प्रत सादर केली नव्हती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुनावणी टाळली आहे. आता 31 मे रोजी सकाळी 11 वाजता या प्रकरणाची सुनावणी होईल. याचिकेमध्ये बारावीची परीक्षा स्थगित करण्याऐवजी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेमध्ये म्हणण्यात आलंय की, कोरोनाची परिस्थिती देशात गंभीर बनली आहे. अशा स्थितीत परीक्षा घेणे जोखमीचे ठरु शकते. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पुढील काही आठवड्यात घेणे शक्य नाही. शिवाय परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेशावर याचा प्रभाव पडू शकतो.
300 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाला लिहिलं पत्र
300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश एनवी रमण्णा यांना पत्र लिहिलं आहे. परीक्षा मागील वर्षाप्रमाणे वैकल्पिक मुल्यांकन पद्धतीने घेतली जावी. असे असले तरी MoE च्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आतापर्यंत मिळालेल्या फिडबॅकनुसार परीक्षा आयोजित केले जाण्यावर सहमती बनत आहे. शिक्षणमंत्री 1 जूनला बारावीच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतील. दुसरीकडे, काँग्रेस परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. शिक्षणमंत्र्यांविरोधात मंत्रालयाबाहेर आंदोलन केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.