'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

PM Modi: यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30,000 हून अधिक कृषी सखी प्रशिक्षित स्वयंसहाय्यता गटांना प्रमाणपत्रे देखील वितरित करणार आहेत.
PM Kisan Samman Nidhi Installment
PM Kisan Samman Nidhi InstallmentSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे 18 जून रोजी PM KISAN योजनेचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत. याद्वारे 9.26 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा लाभ मिळणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30,000 हून अधिक कृषी सखी प्रशिक्षित स्वयंसहाय्यता गटांना प्रमाणपत्रे देखील वितरित करणार आहेत.

हा 17 वा हप्ता सुमारे 9.3 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. यासाठी सरकार 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. हा 17वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत.

असे चेक करा पैस जमा झाले की नाही

पहिली स्टेप

17 वा हप्ता उद्या म्हणजेच 18 जून 2024 रोजी हस्तांतरित होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्हालाही हप्त्याचा लाभ मिळेला की नाही हे जाणून घ्यायचे असेल, या स्टेप्स फॉलो करून ते तपासू शकता.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.

PM Kisan Samman Nidhi Installment
Priyanka Gandhi Wayanad: आता वायनाडला प्रियंका गांधींचा 'हात'; पहिल्यांदाच उतरल्या निवडणुकीच्या मैदानात

दुसरी स्टेप

वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, परंतु येथे तुम्हाला 'नो युवर स्टेटस' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक भरावा लागेल

येथे स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा

तिसरी स्टेप

आता तुम्ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला 'Get Details' हा पर्याय दिसेल.

तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल.

यामध्ये तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेला की नाही हे कळू शकेल.

PM Kisan Samman Nidhi Installment
UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.