या प्रकरणी नोएडा पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळालाय. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय.
PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय.
नोएडा पोलिसांनी (Noida Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पोलिस स्टेशन सेक्टर-20 मध्ये एका वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्यानं तक्रार नोंदवलीये.
या घटनेची नोंद करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी नोएडा पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळालाय. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल, असा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांची चौकशी सुरू केली आहे. (Latest Marathi News)
सहायक पोलिस आयुक्त रजनीश वर्मा म्हणाले, सेक्टर 16-ए येथील एका वाहिनीचे व्यवस्थापक विजय कुमार यांनी पोलिसांकडं तक्रार करताना सांगितलं की, 'त्यांच्या कंपनीचे सीएफओ कुशन चक्रवर्ती यांना अज्ञातानं ई-मेल पाठवला आणि त्यात देशाच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली.'
पोलीस या प्रकरणाच्या अगदी जवळ पोहोचले असून, लवकरच याचा खुलासा केला जाईल, असा दावा त्यांनी केलाय. सायको व्यक्तीनं किंवा प्रेमात अपयशी ठरलेल्या व्यक्तीनं असा मेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.