Bharat Ratna : माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्यासह नरसिंह राव अन् डॉ. स्वामिनाथन यांना 'भारतरत्न'; PM मोदींची घोषणा

5 People Who Have Been Awarded Bharat Ratna This Year : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे
pm Modi announces Bharat Ratna to Dr MS Swaminathan PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh
pm Modi announces Bharat Ratna to Dr MS Swaminathan PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh
Updated on

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. (PM Modi announces Bharat Ratna to Dr MS Swaminathan, PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh)

पीएम मोदींनी लिहिले की, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.

पीएम मोदी म्हणाले की, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत किंवा देशाचे गृहमंत्री असोत आणि आमदार म्हणूनही चौधरी चरणसिंग यांनी नेहमीच राष्ट्र उभारणीला चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. (Bharat Ratna to haudhary Charan Singh)

कृषितज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याबद्दल देखील पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट केली आहे. भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.

एक नवोदित आणि मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्याची आपल्याला जाण आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली. ते मला जवळून ओळखत असत आणि मी नेहमी त्यांचा सल्ला मोलाचा मानत आलो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. (Bharat Ratna award to Dr. MS Swaminathan)

आपले माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले. नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्त्वपूर्ण उपायोजनांनी भरलेला आहे. ज्याने भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते. या योगदानाच्या जोरावर त्यांनी भारतात मोठे परिवर्तन तर घडवून आणलेच सोबतच सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. (Bharat Ratna award to PV Narasimha Rao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.