PM Modi on Jan Aushadhi Kendra : देशातील जन औषधी केंद्रांची संख्या वाढवून 25,000 करणार! मोदींची मोठी घोषणा

Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PM मोदी लाल किल्ल्यावरुन बोलत होते.
PM Modi on Jan Aushadhi Kendra
PM Modi on Jan Aushadhi KendraeSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कित्येक मोठ्या घोषणा केल्या. यातच देशातील जन औषधी केंद्रांची संख्या वाढवण्याच्या घोषणेचाही समावेश होता.

देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PM मोदी लाल किल्ल्यावरुन बोलत होते. देशात उपलब्ध असणाऱ्या 10 हजार जन औषधी केंद्रांनी नागरिकांना, खास करुन मध्यमवर्गीयांना नवीन शक्ती दिली आहे; असं ते म्हणाले.

PM Modi on Jan Aushadhi Kendra
PM Modi Speech : मित्रों, मेरे प्रिय देशवासियों ते मेरे प्यारे परिवारजनों! मोदींच्या भाषणातील बदललेल्या शब्दांमागचं रहस्य

देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PM मोदी लाल किल्ल्यावरुन बोलत होते. देशात उपलब्ध असणाऱ्या 10 हजार जन औषधी केंद्रांनी नागरिकांना, खास करुन मध्यमवर्गीयांना नवीन शक्ती दिली आहे; असं ते म्हणाले.

PM Modi on Jan Aushadhi Kendra
PM Modi Speech : 'भारत देश आता 6G साठी तयार'; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन घोषणा!

जन औषधी केंद्रांचा फायदा

"एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाला असेल, तर त्याच्या महिन्याच्या औषधांचा खर्च साधारणपणे 3000 रुपये होतो. मात्र, जनऔषधी केंद्राच्या मदतीने हा खर्च कमी झाला आहे. जी औषधं इतर ठिकाणी 100 रुपयांना उपलब्ध आहेत, ती या केंद्रांवर केवळ 10 ते 15 रुपयांमध्ये मिळत आहेत.", असं पंतप्रधान म्हणाले.

केंद्रांची संख्या वाढवणार

पंतप्रधान मोदींनी आज घोषणा केली, की सरकार सध्या जनऔषधी केंद्रांची संख्या वाढवण्यावर काम करत आहे. 10,000 वरुन ही संख्या 25,000 करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशातील आणखी नागरिकांना स्वस्त आणि जेनेरिक औषधं घेता येणार आहेत.

PM Modi on Jan Aushadhi Kendra
PM Modi Speech: 'देश मणिपूरच्या जनतेसोबत, शांततेनेच यावर तोडगा निघेल'; स्वातंत्र्यदिनी PM मोदींनी लाल किल्ल्यावरून दिले आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()