मोदींच्या संपत्तीत वर्षभरात २२ लाखांची वाढ; कुठे करतात गुंतवणूक?

पंतप्रधान मोदी कुठे करतात गुंतवणूक?
PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam eSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत जवळपास प्रत्येक गोष्टीचं लोकांना आकर्षण असतं. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी केलेल्या इमेज बिल्डिंगला याचं श्रेय द्यावं लागेल. मोदी यांच्याशी संबंधित कपडे, त्यांच्या वापरातील वस्तू, प्राणी,इ सर्वजण चर्चेत असतात. पण मोदी यांची संपत्ती किती आहे, आणि ते कुठे गुंतवणूक करतात हे तुम्हाला माहिती आहे का?

पंतप्रधान मोदी यांची एकूण संपत्ती 3.07 कोटी आहे. मागील वर्षी हा आकडा 2.85 कोटी होता. यामध्ये गेल्या वर्षभरात 22 लाखांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार वर्षभरात मोदी यांची संपत्ती 22 लाखांनी वाढली आहे. अद्याप त्यांनी शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

मोदी यांनी नॅशनल सेव्हिंग फंडात 8.9 लाख रुपये गुंतवले आहेत. जीवन विमा पॉलिसीत 1.5 लाख तसेच एल अॅन्ड टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बाँड स्वरुपात पैसे गुंतवले आहेत. 2012 साली त्यांनी हा बाँड 20 हजारांमध्ये विकत घेतला होता.

गुंतवणुकीचा 'मोदी फॉर्म्युला'

पंतप्रधानांच्या संपत्तीत झालेली वाढ मुख्यतः स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेतील त्यांच्या मुदत ठेवींमुळे झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी डिक्लेरेशन फॉर्ममध्ये भरली आहे. 31 मार्च रोजी मुदत ठेवींची रक्कम 1.6 कोटी होती आता ही रक्कम 1.86 कोटी रुपये झाली आहे.

पंतप्रधान झाल्यापासून गुंतवणूक बंद?

मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून कोणतीही नवीन मालमत्ता खरेदी केलेली नाही. त्यांची एकमेव निवासी मालमत्ता आहे. ज्याची किंमत 1.1 कोटी रुपये आहे. त्यांनी 2002 साली ही मालमत्ता खरेदी केली होती. मात्र यामध्ये मोदींची मालकी एक चतुर्थांश आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, 14,125 स्क्वेअर फूटच्या एकूण मालमत्तेच्या फक्त 3,531 चौरस फूटांवर मोदींचा हक्क आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()