PM मोदी लाल किल्ल्यावरून करणार देशाला संबोधित; मोडणार जुनी परंपरा

pm modi breaks from tradition to address nation from red fort after sunset
pm modi breaks from tradition to address nation from red fort after sunset sakal
Updated on

शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. लाल किल्ल्यावरून सूर्यास्तानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ही परंपरा मोडणारे पंतप्रधान मोदे हे पहिले नेते ठरणार आहेत.

पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीऐवजी लॉनमधून भाषण करतील. 1675 मध्ये मुघल शासक औरंगजेबने लाल किल्ला येथूनच नववे शीख गुरु, गुरू तेग बहादूर यांना फाशी देण्याचे आदेश दिल्याने या किल्ल्याचे ठिकाणाची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी लाल किल्ल्याची तटबंदी आहे जिथून पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करतात, स्वातंत्र्य दिनाव्यतिरिक्त मोदी स्मारकावरून भाषण करण्याची ही दुसरी वेळ आहे.

pm modi breaks from tradition to address nation from red fort after sunset
पुतण्याने NEET च्या अभ्यासात व्यत्यय आणल्याने वहिनीचा भोसकून खून

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी रात्री 9.30 वाजता देशाला संबोधित करतील आणि त्यांच्या भाषणात विविध धर्म आणि समुदायांमध्ये सामंजस्यावर भर दिला जाईल. यावेळी 400 शीख वादक "शबद कीर्तन" करणार असून लंगरचेही आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि इतर राज्यांचे 11 मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख शीख नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 400 शीख जथेदारांच्या कुटुंबीयांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या जत्थेदारांच्या कुटुंबीयांचाही समावेश असेल.

pm modi breaks from tradition to address nation from red fort after sunset
भारतीय वायुसेनेची सुखोई 30-MkI वरून 'ब्रह्मोस'ची यशस्वी चाचणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()