PM Modi Cabinet : कोणी ३६ वर्षाचं, तर कोणी ७९ वर्षाचे, मोदींच्या मंत्रिमंडळातील किती खासदार तरूण अन् किती वयस्कर?

एनडीए सरकारमधील १२ हून अधिक चेहरे ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत
PM Modi Cabinet
PM Modi Cabinetesakal
Updated on

PM Modi Cabinet :

देशाचे पंतप्रधान होण्याची संधी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा मिळाली. NDA संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी सरकारचा ३.० हा मागील सरकारपेक्षा किती वेगळा आहे यावरही चर्चा सुरू आहे.

२०१९ मध्ये, जेव्हा मोदी २.० सरकार स्थापन झाले आणि मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांचे सरासरी वय ६१ वर्षे होते. २०२१ मध्ये जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा सरासरी वय ३ वर्षांनी कमी होऊन ५८ वर्षे झाले. म्हणजेच सरासरी वयाच्या बाबतीत मोदी सरकारने यावेळेसही जुन्याच चेहऱ्यांना स्थान दिले आहे

PM Modi Cabinet
Modi Took Charge as PM: मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; कार्यभार स्वीकारताच घेतला हा मोठा निर्णय!

यंदा नवीन मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. ३६ वर्षीय राममोहन हे सर्वात लहान आहेत. तर ७९ वर्षांचे जितनराम मांझी हे सर्वात वृद्ध आहेत.

राष्ट्रपती भवनात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. केवळ जुन्या चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. ३३ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ७ महिला खासदारांना मंत्री करण्यात आले आहे.

यामध्ये राज्यसभा खासदार निर्मला सीतारामन यांचेही नाव आहे. शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळाली. पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, गजेंद्र सिंह शेखावत, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, प्रल्हाद जोशी आणि हरदीप पुरी हे देखील नवीन सरकारचा भाग बनले आहेत.

PM Modi Cabinet
Narendra Modi Oath Ceremony : मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की... पदग्रहण करण्यापूर्वी का घेतली जाते शपथ? जाणून घ्या नियम

मात्र, अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला, राजीव चंद्रशेखर, स्मृती इराणी, नारायण राणे या दिग्गजांना यावेळी सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही. अनुराग, रुपाला आणि नारायण राणे यांनीही निवडणुकीत विजय मिळवला.

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपला विजय मिळवून देणारे सुरेश गोपी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. लुधियानामधून निवडणूक पराभूत झालेले रवनीत सिंह बिट्टू यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. बिट्टू यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

PM Modi Cabinet
Narendra Modi Oath Ceremony : PM नरेंद्र मोदी शपथ घेत असलेल्या संसद भवनासाठी ३३० एकर जमीन कुणी दिली?

मोदी सरकार ३.० चे सरासरी वय ५८.७० वर्षे आहे. गेल्या वेळी हे सरासरी वय ६१ वर्षे होते. नंतर २०२१ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ते ५८ वर्षे करण्यात आले. यावेळी सर्वात वयोवृद्ध मंत्री ७९ वर्षांचे जीतन राम मांझी आहेत. सर्वात तरुण आहेत ३६ वर्षीय के राममोहन नायडू TDP आणि ३७ वर्षीय रक्षा खडसे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, एनडीए सरकारमधील १२ हून अधिक चेहरे ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत.

PM Modi Cabinet
PM Modi Salary : पंतप्रधानांना देखील भरावा लागतो टॅक्स? कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांच्या पगारामध्ये नेमका फरक काय

मोदींच्या मंत्रिमंडळात ७० पार केलेले किती मंत्री आहेत?

  • जितन राम मांझी (७९ वर्षे)

  • राव इंद्रजीत सिंग (७४ वर्षे)

  • रामनाथ ठाकूर (७३ वर्षे)

  • व्ही. सोमन्ना (७३ वर्षे)

  • गिरीराज सिंह (७२ वर्षे)

  • राजनाथ सिंह (७२ वर्षे) )

  • हरदीप सिंग पुरी (७२ वर्षे)

  • श्रीपाद नायक (७१ वर्षे)

  • डॉ. वीरेंद्र कुमार (७१ वर्षे)

  • मनोहर लाल (७० वर्षे)

  • अर्जुन राम मेघवाल (७० वर्षे)

  • भगीरथ चौधरी (७० वर्षे)

PM Modi Cabinet
PM Narendra Modi Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात मोदींच्या जॅकेटची चर्चा, 'हे' आहे खास कारण

मोदींच्या सरकारमध्ये ३० च्या वरील केवळ दोनच मंत्री आहेत.

  • के राममोहन नायडू (३६ वर्ष)

  • रक्षा निखिल खडसे (३७ वर्ष)

यासह नव्या सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागलेले ६० पार असलेले २३, ५० पार केलेले २० आणि ४० शी पार असलेले १४ मंत्री आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.