PM Modi: चंद्रयान यशस्वी होताच मोदींची मोठी घोषणा, भारताने अंतराळ उद्योगासाठी केली तब्बल...

PM Modi Chandrayaan-3 Success Updates : अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर पोहोचली आहे.
PM Modi Chandrayaan-3 Success Updates
PM Modi Chandrayaan-3 Success UpdatesSakal
Updated on

PM Modi Chandrayaan-3 Success Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ग्रीसहून थेट बेंगळुरूला पोहोचले. येथे ते इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आणि इस्रो प्रमुख एस सोमनाथ आणि इतर शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

चंद्रयान-3 च्या यशानंतर पंतप्रधान मोदी बेंगळुरूमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना भावूक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांचे कौतुक करताना थोडावेळ मौन बाळगले आणि भावनांना आवर घातला.

हा आजचा भारत आहे - पंतप्रधान मोदी

शास्त्रज्ञांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमच्या मेहनतीला, तुमच्या संयमाला सलाम करतो. पीएम मोदी म्हणाले की, हा आजचा भारत आहे, लढाऊ भारत आहे.

PM Modi Chandrayaan-3 Success Updates
Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत मात्र सोने खरेदीत तेजीत! असं का घडतंय?

अंतराळ उद्योग 8 अब्ज डॉलर वरून 16 अब्ज डॉलर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, तज्ञांचे म्हणणे आहे की काही वर्षांत भारताचा अंतराळ उद्योग 8 अब्ज डॉलर वरून 16 अब्ज डॉलर होईल. भारतात नवीन शक्यतांची दारे उघडत आहेत.

अंतराळ क्षेत्रातही सरकार सातत्याने सुधारणा करत आहे. गेल्या 4 वर्षात अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर पोहोचली आहे. चंद्रयानासंदर्भात प्रश्नमंजुषा स्पर्धा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मी तरुणांना यात सहभागी होण्याचे आवाहन करतो.

PM Modi Chandrayaan-3 Success Updates
Chandrayaan-3: 615 कोटींच्या चांद्रयानातून 31 हजार कोटींची कमाई, कोणी भरली एवढी तिजोरी?

एकेकाळी आपल्याला तिसरे जग म्हटले जायचे - पंतप्रधान मोदी

पीएम मोदी म्हणाले, 'एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशाची गणना तिसऱ्या रांगेत होत होती. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेतून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.

शास्त्रज्ञांना सांगितले - तुम्ही एक आदर्श आहात

इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, तुम्ही नवीन पिढीचे आदर्श आहात, तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते तुम्ही करता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.