PM मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, राज्यांसाठी नव्या सूचना?

PM Modi Corona Review Meeting
PM Modi Corona Review Meeting sakal
Updated on

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण (India Corona Cases) आढळून आल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Modi Corona Review Meeting) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत येत्या १३ जानेवारीला बैठक घेणार आहेत. यामध्ये ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. तसेच राज्यांसाठी काही नव्या सूचना देण्याची शक्यता आहे.

PM Modi Corona Review Meeting
कोरोनाचा धसका; पंतप्रधान मोदींनी रद्द केला पुणे दौरा

देशात डिसेंबर महिन्यात ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आढळून आला आणि एक महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे संबंधित राज्य सरकारने निर्बंध घोषित केले आहेत. महाराष्ट्रात दिवस जमावबंदी आणि रात्री संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच जीम, सलून, खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्याने सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे अशी सूचना आधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. पण, राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहेत त्यांना पंतप्रधान काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशात कोरोनाची स्थिती काय? -

गेल्या दोन दिवसांत ५०० च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसभरात सापडत आहेत. आज ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या ४ हजार ४६१ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १०.६४ टक्के इतका आहे. तसेच दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.