गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आदिवासी दाहोद जिल्ह्यात (Tribal Dahod District) सत्याग्रह रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी दोन भारत बनवले आहेत. एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरीबांसाठी! एकीकडं देशाची संपत्ती काही श्रीमंतांना दिली जात आहे, तर दुसरीकडं गरीब जनतेला साधनांअभावी जगावं लागतंय, असा टोला त्यांनी मोदींना लगावलाय.
'आदिवासी सत्याग्रह रॅली'दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलंय. ते म्हणाले, 'राज्यात पुन्हा काँग्रेस (Congress) सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदीजी 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. त्याआधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. जे काम मोदींनी गुजरातमध्ये सुरू केलंय, तेच काम ते देशात करत आहेत. त्याला गुजरात मॉडेल (Gujarat Model) म्हटलं जातंय. पण, यात सर्वसामान्य जनतेची दिलाभूल केली जात आहे.'
राहुल गांधी पुढं म्हणाले, 'आज दोन भारत बनवले जात आहेत. एक श्रीमंतांचा भारत, यात काही अब्जाधीशांचा समावेश आहे. तर, दुसरा भारत सामान्य लोकांचा आहे. पण, काँग्रेस पक्षाला दोन भारत नको आहेत. भाजप मॉडेलमध्ये आदिवासी आणि इतर गरीब लोकांच्या मालकीचे जल (पाणी), जंगल आणि जमीन यासारखी लोकसंपदा काही निवडक लोकांना दिली जात आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनं आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलंय. हे सरकार तुम्हाला काही देणार नाही, पण तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेईल, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.