Vande Bharat Train : देशातील ११ राज्यांना मिळालं मोठं गिफ्ट! PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Train
Vande Bharat Train
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत गाड्यांमुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढेल. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरात अनेक मार्गांवर धावत यामध्ये आणखी नऊ रेल्वे गांड्याची भर पडणार आहे.

या नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या कर्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते.

Vande Bharat Train
Ajit Pawar : "माझं ते काम नाही..."; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या त्या फोटोवर अजित पवार स्पष्टच बोलले

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. पायाभूत सुविधांचा वेग देशातील 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारा आहे. आजच्या भारताला हेच हवे आहे. पंतप्रधान म्हणाले की आज एकाच वेळी 9 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. याचे हे उदाहरण आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातसह 11 राज्यांतील लोकांना आज वंदे भारतची सुविधा मिळाली आहे.

Vande Bharat Train
India-Canada Row : तुमच्याही जीवाला धोका...; निज्जरच्या हत्येनंतर FBIने अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांना केलं सावध; रिपोर्टमध्ये दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.