पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. खासदारांचा शपथविधी अद्याप सुरू आहे. निवडणुका आणि निकालातील यशानंतर भाजपने आज नवे सरकार स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये एकूण किती खासदार आहेत. तसेच, त्यापैकी उच्चवर्णीय , ओबीसी, दलित आणि आदिवासी खासदार आहेत, याची माहिती घेऊयात.
भाजप आणि घटक पक्षांसह आज 71 मंत्री आज शपथ घेत आहेत. यामध्ये सुमारे 21 उच्चवर्णीय , 27 ओबीसी, 10 दलित, 5 आदिवासी आणि 5 अल्पसंख्याक जातीच्या खासदारांचा समावेश आहे. भाजपने सर्व जातीय मंत्रिमंडळ डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाची विभागणी केली आहे.
उच्चवर्णीय खासदार
अमित शाह, एस जयशंकर, मनसुख मांडविया, राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, जयंत चौधरी, धर्मेंद्र प्रधान, रवनीत बिट्टू, नितीन गडकरी, पीयूष गोयल, मनोहर लाल खट्टर, जितेंद्र सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, संजय सेठ, राम मोहन नायडू, सुकांत मजुमदार, प्रल्हाद जोशी, जेपी नड्डा, गिरीराज सिंग, लालन सिंग, सतीशचंद्र दुबे यांचा समावेश आहे.
ओबीसी खासदार
सीआर पाटील, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, बीएल वर्मा, रक्षा खडसे, प्रताप राव जाधव, शिवराजसिंग चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, राव इंद्रजित सिंग, कृष्णपाल गुर्जर, भूपेंद्र यादव, भगीरथ चौधरी, अन्नपूर्णा देवी, शोभा करंडलवासी, एचडी कुमार रावजी, एन यांचा समावेश आहे.
दलित खासदार
यामध्ये एसपी बघेल, कमलेश पासवान, अजय टम्टा, रामदास आठवले, वीरेंद्र कुमार, सावित्री ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, चिराग पासवान, जीतन राम मांझी, रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे.
आदिवासी खासदार
जुएल ओराम, श्रीपद येसो नाइक, सर्वानंद सोनोवाल हे खासदार आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.