Central Government: मोदींची खास योजना; महिलांना मोफत वॉशिंग मशीन? सरकारने दिलं स्पष्टीकरण

Fact Check: सरकारी पोर्टल पीआयबीने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. पीआयबीने म्हटलंय की, युट्यूब चॅनेल ज्ञानमंदिर ऑफिशियलने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन वाटप करणार आहे. देशभरातील महिलांना याचा लाभ होईल, असंही म्हटलं आहे.
Central Government: मोदींची खास योजना; महिलांना मोफत वॉशिंग मशीन? सरकारने दिलं स्पष्टीकरण
Updated on

Free Washing Machine: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक योजना आणून सामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. अशीच एक योजना सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. महिलांसाठी पंतप्रधान मोदी वॉशिंग मशीन देणार आहेत, असा मेसेज फिरत आहे. नेमकी ही योजना काय सांगितली जातेय आणि वस्तुस्थिती काय आहे? हे पाहूया.

'फ्री वॉशिंग मशीन योजना' या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. यात म्हटलंय की, मोदी सरकार लवकरच देशातील महिलांना फ्री वॉशिंग मशीन वाटणार आहे. केवळ एक- दोन राज्यांसाठी ही योजना नसून संपूर्ण राज्यात अंलबजावणी करण्यात येणार आहे, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आलेला आहे.

पीआयबीचा खुलासा

सरकारी पोर्टल पीआयबीने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. पीआयबीने म्हटलंय की, युट्यूब चॅनेल ज्ञानमंदिर ऑफिशियलने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी मोफत वॉशिंग मशीन वाटप करणार आहे. देशभरातील महिलांना याचा लाभ होईल, असंही म्हटलं आहे.

चुकीची बातमी कुणी पसरवली?

gyanmandirofficials या यूट्युब चॅनेलचे साधारण ११ हजार सब्स्क्राईबर आहेत. या चॅनेलवर ८.१५ मिनिटांचा एक व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे. त्यात दावा केलाय की, महिलांसाठी मोदी सरकार वॉशिंग मशीनची सुविधा पुरवणार आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी रितसर अर्ज करावा लागेल. रजिस्ट्रेशन आणि क्लेम करण्याची प्रक्रिया व्हिडीओमध्ये सांगण्यात आलेली आहे.

Central Government: मोदींची खास योजना; महिलांना मोफत वॉशिंग मशीन? सरकारने दिलं स्पष्टीकरण
Share Market Closing: दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद; कोणते शेअर्स कोसळले?

सरकारचं स्पष्टीकरण

पीआयबी फॅक्टचेकने या व्हिडीओचा स्क्रीनशॉर्ट आपल्या ऑफिशयल ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. त्यावर लिहिलं की, युट्यूब चॅनेलच्या वतीने पसरवल्या गेलेल्या खोट्या माहितीपासून सावध व्हा. मोदी सरकार अशी कोणतीही योजना आणत नाहीये, तशी कुठलीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकांनी असल्या खोट्या दाव्यांपासून दूर राहिलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.