'गरिबांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं ही आमची वचनबद्धता आहे.'
PM Narendra Modi Gujarat Visit News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजकोट येथील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातोश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. यानंतर देशाला संबोधित करताना मोदींनी भाजप सरकारनं केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
मोदी म्हणाले, गरिबांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं ही आमची वचनबद्धता आहे. 3 कोटींहून अधिक गरीबांना पक्की घरं मिळाली असून 10 कोटींहून अधिक कुटुंबांना ODF मधून मुक्ती मिळालीय. तर, 9 कोटींहून अधिक गरीब महिलांची धुरापासून सुटका झालीय. शिवाय, 2.5 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांकडं वीज आहे. तर, 6 कोटींहून अधिक कुटुंबांना वीज उपलब्ध झालीय, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. दरम्यान, आठ वर्षांत मी माझं डोकं कोणापुढं झुकू दिलं नाही, असंही मोदी म्हणाले.
मोदी पुढं म्हणाले, आमचं सरकार नागरिकांना 100 टक्के सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबवत आहे. प्रत्येक नागरिकाला सुविधा उपलब्ध करून देण्याचं आमचं उद्दिष्ट असेल. यात कोणताही भेदभाव अथवा भ्रष्टाचाराला थारा नाही. कोरोना महामारीच्या काळात देशाचं मोठं नुकसान झालंय. मात्र, गरीबांसाठी आमचं सरकार कुठंही कमी पडलं नाही.
आमच्या माता-भगिनींच्या जन धन बँक खात्यात पैसे जमा केले. तसेच शेतकरी-मजुरांच्या बँक खात्यातही पैसे जमा करण्यात आले आहेत. शिवाय, गरिबांचं स्वयंपाकघर चालू राहावं म्हणून मोफत गॅस सिलिंडरची व्यवस्थाही केली. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशसेवेची 8 वर्षे पूर्ण करत आहे. या काळात आम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नाही. गेली अनेक वर्षे आम्ही गरीबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचं कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून आपण देशाच्या विकासाला नवी गती दिलीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.