मोदी स्वत: घरी गेले, चहा प्यायला अन् प्राणप्रतिष्ठापणेचं निमंत्रण दिलं; का खास आहेत मीरा मांझी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अयोध्येमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मीरा मांझी यांच्या घरी जाऊन सरप्राईज भेट दिली.
PM Modi In Ayodhya
PM Modi In Ayodhya
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अयोध्येमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मीरा मांझी यांच्या घरी जाऊन सरप्राईज भेट दिली. तसेच मोदी यांनी मीरा यांच्या घरी चहा देखील घेतला. मीरा मांझी या खास व्यक्ती ठरल्या आहेत. (PM Modi had tea at Meera house during his Ayodhya tour today Ujjwala Yojana beneficiary )

मीरा मांझी या त्यांचे पती, मुलांसोबत अयोध्येमध्ये राहतात. त्यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण, मीरा मांझी या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्जवा योजनेच्या १० कोटीव्या लाभार्थी आहेत.

PM Modi In Ayodhya
Ayodhya Ram Mandir : अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार

मीरा मांझी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत याची मला माहिती नव्हती. एका तासांपूर्वी मला सांगण्यात आलं की एक राजकीय नेता भेटायला येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटायला आले. त्यांनी मुलांशी देखील संवाद साधला. मोदींनी मला विचारलं आज जेवण्यासाठी काय केलं आहे. दाळ, रोटी, भाजी केल्याचं मी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला चहा करण्यास सांगितलं. चहा थोडा गोड झाला असल्याचं मोदी म्हणाले. पण, आमच्याकडे असाच चहा करतात असं मी त्यांना सांगितलं.

PM Modi In Ayodhya
Ram Mandir: पंतप्रधान मोदींनी स्वत: घरी जाऊन प्रतिष्ठापणेचं निमंत्रण दिलेले निषाद कोण आहेत?

पंतप्रधान मोदी यांनी आज अयोध्येत अयोध्याधाम रेल्वेस्थानक आणि नवे विमानतळ महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. माहितीनुसार, जवळपास १५,००० कोटी विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अयोध्येत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येमध्ये निषाद कुटुंबियांची भेट घेतली. रविंद्र मांझी यांना अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. प्रभू राम यांना वनवासादरम्यान शरयू पार करणारे निषाद राज हे त्यांचे पूर्वज असल्याचं सांगितलं जातं (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.