इम्रान, किम, मोदी माध्यम स्वातंत्र्याचे भक्षक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांच्या साथीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माध्यम स्वातंत्र्याच्या भक्षकांच्या यादीत स्थान मिळण्याची नामुष्की ओढविली आहे.
Imran, Kim and Narendra
Imran, Kim and NarendraSakal
Updated on

न्यूयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong Un) यांच्या साथीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर माध्यम (Media) स्वातंत्र्याच्या भक्षकांच्या यादीत स्थान मिळण्याची नामुष्की ओढविली आहे. (PM Modi Imran Khan and Kim Jong un on RSF List of 37 Leaders Suppressing Press Freedom)

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (आरएसएफ) या माध्यमांच्या निरीक्षण संस्थेने ही यादी जाहीर केली आहे. यात ३७ राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. त्यातील १७ जणांना या यादीत प्रथमच स्थान मिळाले. हे नेते मुद्रण नियंत्रणाचे साधनच तयार करीत असल्याचा ठपका या संस्थेने ठेवला आहे. पत्रकारांना एकतर्फी पद्धतीने तुरुंगात टाकणे किंवा त्यांच्याविरुद्ध हिंसाचार घडवून आणणे असे आणखी गंभीर आरोपही ठेवण्यात आले.

Imran, Kim and Narendra
मोदी कॅबिनेटमध्ये OBC, SC आणि युवकांचा वाढणार टक्का?

ही यादी पाच वर्षांच्या खंडानंतर जाहीर करण्यात आली. याआधी २०१६ मध्ये अशी यादी जाहीर झाली होती.

यादीतील नेत्यांचे सरासरी वय ६६ इतके आहे. यातील एकतृतीयांश आशिया-प्रशांत विभागातील आहेत.

दोन महिलांचाही समावेश

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि हाँगकाँगच्या मुख्य प्रशासक केरी लॅम या दोन महिलांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत महिलांचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात हाँगकाँगच्या मुख्य प्रशासक केरी लॅम यांचा समावेश आहे. चीनने नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यापासून हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी कार्यकर्ते, नेते आणि संस्थांची मुस्कटदाबी सुरु झाली आहे. नुकतेच अॅपल डेली हे वृत्तपत्र बंद पाडण्यात आले. त्याआधी माध्यमसम्राट जिमी लाई यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या कंपनीची मालमत्ता आणि बँक खाती गोठविण्यात आल्यामुळे प्रकाशन थांबवण्याची वेळ आली.

आधी वापर, मग मुस्कटदाबी

  • बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार शेख मुजिबूर रेहमान यांचे सर्वांत लहान अपत्य असलेल्या शेख हसीना १९८०च्या दशकापासून राजकारणात सक्रिय

  • विरोधक असताना विविध सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविला

  • डिसेंबर २००८ मध्ये सत्तेवर आल्यापासून मात्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लक्ष्य करण्यास प्रारंभ

  • २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांना वृत्तपत्रांची मदत घेण्यास बंदीच घातली.

  • कोणतीही टीका सहन करण्याची अजिबात तयारी नाही

  • २०१८ मध्ये डिजिटल सुरक्षा कायदा लागू केला, सुव्यवस्था धोक्यात आणेल असा ऑनलाइन मजकूर किंवा लेखन केल्यास सात वर्षांचा कारावास

  • या कायद्याच्या जोरावर ४०० पेक्षा जास्त व्यक्ती, ७० पेक्षा जास्त पत्रकार किंवा ब्लॉगर्सवर कारवाई

यादी मध्ये हे सुद्धा

  • व्हिक्टर ओर्बन - हंगेरीचे पंतप्रधान

  • जाईर बोल्सोनारो - ब्राझीलचे अध्यक्ष

  • मीन आँग हिलैंग - म्यानमारमधील लष्करी उठावाचे सूत्रधार

  • रिजीब तय्यीप एर्दोगन - तुर्कस्तानचे अध्यक्ष

  • रॉड्रीगो ड्युटेर्टे - फिलिपिन्सचे अध्यक्ष

Imran, Kim and Narendra
इंडियन आर्मीची गोपनिय माहिती ISIला पुरवली; दोन जवानांना अटक

भारताचा क्रमांक १८० देशांत १४२ वा

गुजरातचे मॉडेल मोदींकडून देशात लागू

  • २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून पश्चिमेकडील या राज्याचा बातम्या आणि माहितीवरील नियंत्रणाची प्रयोगशाळा म्हणून वापर

  • २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान बनल्यानंतर याच पद्धतीचा अवलंब सुरु

  • मुख्य प्रवाहातील माध्यमांचे रकाने आपल्या भाषणाने भरून टाकणे हे मुख्य हत्यार

  • आपली राष्ट्रीय तत्त्वप्रणाली-विचारसरणी वैध ठरविणाऱ्या माहितीचा मारा

  • मोठा विस्तार असलेल्या माध्यम समुहांची मालकी असलेल्या अब्जाधीश उद्योगपतींशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करून आपले हेतू पूर्ण करणे

  • विश्वासघातकी धोरणामुळे दुहेरी फायदा - १) माध्यमांच्या मालकांबरोबरील मैत्रीमुळे आपल्यावर टीका केल्यास नोकरी जाण्याचा धोका हे तेथील पत्रकारांना कळून चुकते २) अत्यंत विभाजनवादी आणि अशोभनीय अशा वक्तव्यांना भरभरून प्रसिद्धी, जी विक्रमी वाचकांपर्यंत पोचते

  • विभाजनवादी पद्धतींविरुद्ध आवाज उठविणारे माध्यम समूह आणि पत्रकारांना निष्फळ करणे इतकेच बाकी

  • यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्याला मोठा धोका निर्माण करण्याच्या तरतुदी असलेली न्यायालयीन संस्था दिमतीला

  • राजद्रोहाच्या अत्यंत अस्पष्ट अशा आरोपाखाली आजीवन कारावासाचा विरोधी पत्रकारांसमोर धोका

  • ऑनलाइन माध्यमांचा वापर करून ट्रोलच्या जोरावर अपप्रचार करणाऱ्या योद्धांची टोळी कामी आणणे

  • नावडत्या पत्रकारांविरुद्ध मोहिमा चालविणे, अनेकदा त्यांना मारून टाकण्याचे आवाहन करण्यापर्यंत मजल

  • हिंदुत्वाचा बळी म्हणून पत्रकार गौरी लंकेश यांचे उदाहरण सर्वाधिक ठळक

  • मोदींची व्यक्तीपूजा करणाऱ्या हिंदू राष्ट्रीयवदाला विरोध करणाऱ्या पत्रकार किंवा माध्यम समूहांना निधर्मी ठरवून लक्ष्य करण्यासाठी भक्तांचीही मदत

  • हे भक्त विरोधी पत्रकारांविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल करतात, ऑनलाइन टीकेसाठी मोहिमा चालवितात

  • पत्रकार महिला असल्यास प्रचंड गरळ ओकली जाते, त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती पत्रकारितेचा आरोप करणे

  • यासाठी गौरी लंकेश यांच्याशिवाय राणा अय्युब, बरखा दत्त यांच्या नावांचाही आरएसएफच्या अहवालात उल्लेख

  • अशा महिला पत्रकारांवर सामुहिक बलात्काराच्या धमक्या देणारी आवाहने करणे, त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन पोस्ट करणे अशा कारवाया करण्यापर्यंत मजल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.