PM Modi in Gujrat : ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात दोन हात; पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी, ‘यूएन’ सरचिटणीसांकडून ‘मिशन लाईफ’ची घोषणा
PM Modi in Gujrat fight against Global Warming Mission Life narendra Modi
PM Modi in Gujrat fight against Global Warming Mission Life narendra Modiesakal
Updated on

केवडिया : जागतिक तापमानवाढीविरोधात दोन हात करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटानिओ गुटेरस यांनी आज महत्त्वाकांक्षी ‘लाईफ मिशन’ची घोषणा केली. नैसर्गिक संकटांपासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा वैश्विक कृती आराखडा असेल. पुढील महिन्यात इजिप्तमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे जागतिक तापमानवाढविषयक संमेलन पार पडत आहे, त्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चिरंतन जीवनशैली रुजविण्यासाठी आणि लोकांनी तिचा अवलंब करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरणपूरक वर्तणुकीचा समावेश असेल.

पंतप्रधान मोदींनी यावेळी तीन ‘आर’चा मंत्र दिला, यामध्ये कमी वापर करा (रिड्यूस), फेरवापर करा (रियूज) आणि फेरप्रक्रिया करा (रिसायकल) या तीन संकल्पांचा समावेश आहे. जागतिक तापमानवाढीविरोधात दोन हात करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मिशन लाईफ’च्या माध्यमातून लोकानुकूल ग्रहाची संकल्पना अधिक बळकट होईल, यामध्ये पृथ्वीसाठी आणि पृथ्वीकडून हा विचार केंद्रस्थानी असल्याचे मोदींनी नमूद केले. ‘मिशन लाईफ’च्या माध्यमातून त्रिसूत्रीचा प्रचार आणि प्रसार केला जाणार असून चिरंतन गोष्टींकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनातही त्याद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येईल. आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये वेगाने बदल होऊ लागला असून मागील काही दशकांमध्ये काही अनपेक्षित आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे वातावरणातील बदल हे धोरण निश्चितीच्याही पुढे गेले आहेत, असे मोदींनी सांगितले.

लोकशाही लढा
या ‘मिशन लाईफ’मध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली केंद्रस्थानी असेल. पृथ्वीच्या संरक्षणासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि उपलब्ध स्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे प्रशिक्षण त्यांना देणे हे घटक यात केंद्रस्थानी असतील, असे मोदींनी सांगितले. जागतिक तापमानवाढीविरोधात लोकशाही मार्गाने लढला जाणारा हा लढा आहे त्यामध्ये प्रत्येकजण आपल्यापरीने योगदान देऊ शकतो, असे मोदी म्हणाले.

उपभोगाच्या प्रवृत्तीमुळे समस्या
कोणत्याही गोष्टीचा अधिक उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीमुळे तिहेरी समस्या निर्माण झाली असून जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण या घटकांचा त्यात समावेश आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी सांगितले. पृथ्वीवरील स्रोतांचा आदर करून त्यांचा विवेकाने वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी गुटेरस यांची भेट त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.