India Energy Week 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन केले. हा एनर्जी वीक 6 ते 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या एनर्जी वीकदरम्यान, पीएम मोदी यांनी कर्नाटकातील तुमाकुरू येथे HALच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे आज उद्घाटन केले. ही आशिया खंडातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे. येत्या 20 वर्षांत येथे 1 हजारहून अधिक हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.
हा कारखाना 615 एकरमध्ये पसरला असून येथे हेलिकॉप्टर तयार केले जाणार आहेत. दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्याची योजना आखण्यात आली आहे.
शासनाने संपूर्ण नियोजनासह आखलाय प्लान
1) हेलिकॉप्टर निर्माण क्षमता वाढवण्यावर भर - आशियातील या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याच्या मदतीने देशातील हेलिकॉप्टर बनवण्याची क्षमता वाढणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) बनवले जातील. हे स्वदेशी डिझाइन आणि 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. पहिल्या वर्षी येथे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत.
2) दरवर्षी 60 ते 90 हेलिकॉप्टर तयार होतील : सुरुवातीला 30 आणि नंतर वर्षभरात कारखान्यात 60 ते 90 हेलिकॉप्टर तयार करण्याची तयारी आहे. कारखान्यात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर व्यतिरिक्त, लाईट कॉम्बॅट (एलसीएच) आणि भारतीय मल्टीरोल हेलिकॉप्टर काही काळानंतर विकसित केले जाईल. (IMRH) देखील तयार केले जाईल.
3) स्वावलंबनाबरोबरच निर्यातीलाही चालना : या कारखान्याच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील मेड इन इंडिया मोहिमेला चालना मिळणार असून, याशिवाय हेलिकॉप्टरच्या दुरुस्तीचे कामही येथे होणार आहे. येथे तयार करण्यात येणारे सिव्हिल लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरही निर्यात करण्यात येणार आहे. (Helicopter Company)
4) ६ हजार तरुणांना रोजगार : PMOने जारी केलेल्या निवेदनानुसार पुढील २० वर्षांत येथे १ हजार हेलिकॉप्टर तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे 6 हजार तरुणांना येथे रोजगारही मिळणार आहे. उत्पादन क्षेत्रात देश पुढे जाईल आणि देशातील तरुणांनाही संधी मिळेल.
5) कारखान्यात होतील हे बदल : संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बंगळुरूमध्ये HALची उपस्थिती फायदेशीर ठरेल. यामुळे एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला चालना मिळेल. येथील विकासामुळे शाळा, महाविद्यालय, निवासी परिसराचाही विकास होणार आहे. वैद्यकीय आणि आरोग्य सेवांना चालना मिळेल. याशिवाय, एअर ट्रॅफिक कंट्रोल, फ्लाइट हँगर, फायनल असेंब्ली हँगर, स्ट्रक्चर असेंब्ली हँगर यासारख्या सुविधा बसवून कारखाना पूर्णपणे कार्यरत आहे. ते आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.