पंतप्रधान मोदी आज देशातील 150 स्टार्टअपशी संवाद साधणार

देशातील 150 स्टार्टअप्सना एकूण सहा वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदीsakal
Updated on

देशातील स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (15) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील स्टार्टअपशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम आज सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहे. यंदा स्टार्टअप इंडिया ही योजना सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. सरकारचा एक प्रमुख उपक्रम म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. देशातील 150 स्टार्टअप्सना एकूण सहा वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. यामध्ये समावेश असणाऱ्या कृषी, आरोग्य, एंटरप्राइझ सिस्टम, अंतराळ, उद्योग, सुरक्षा, फिनटेक आणि पर्यावरणासह विविध क्षेत्रातील स्टार्टअपला पंतप्रधान भेट देऊन संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान मोदी
लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या गटांतील ग्रोइंग फ्रॉम रूट्स, डीएनए नेझिंग, लोकल टू ग्लोबल, टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर, बिल्डिंग चॅम्पियन्स इन मॅन्युफॅक्चरिंग आणि शाश्वत विकास या विषयांवर सादरीकरण होणार आहे. प्रत्येक गटाला ठरवून दिलेल्या वेळेत पंतप्रधानांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. स्टार्टअप्सच्या देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी यशस्वीरित्या योगदान कसे देता येईल हे समजून घेत त्यावर कार्यवाहीसाठी या संवादाचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी
पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, स्टार्टअप्स देशाच्या विकासाला मदत करत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा या योजनेच्या क्षमतेवर ठाम विश्वास आहे. गेल्या वर्षाभरातील योजनेच्या यशस्वितेचा विचार केला असता देशातील स्टार्टअप्सचा आर्थिक घटकावर प्रभाव पडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिकतेत सकारात्मक आणि आश्चर्यकारक वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.