आधी ते हिंदूंशी लढले अन् आता ख्रिश्चनांशी... PM Modi यांनी रविवारच्या सुट्टीवरून कोणावर साधला निशाना?

Sunday Holiday: “आपल्या देशात रविवारी सुट्टी असते. जेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते तेव्हा ख्रिश्चन समुदाय सुट्टी साजरी करत असे…रविवार हा हिंदूंशी नसून ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे.
PM Modi Ramtek
PM Modi|Sunday Holidayesakal

पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच 'रविवार' विषयी वक्तव्य केले होते. ते सध्या देशभरात चर्चेत आहे. रविवार हा हिंदू धर्माशी नसून ख्रिश्चन समाजाशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असेही सांगितले की, जेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ख्रिश्चन समुदाय सुट्टी साजरी करत असत, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर देशभरातून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

झारखंडमधील जामतारा येथील काही शाळांनी त्यांची अधिकृत साप्ताहीक सुट्टी रविवारऐवजी शुक्रवारी केली असल्याचे तपासात आढळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड सरकारवर टीका केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की रविवार हा ख्रिश्चनांशी जोडलेला आहे आणि झारखंडमधील एका जिल्ह्याने तो बदलला आहे आणि विरोधी पक्ष आता “ख्रिश्चनांशीही लढत आहेत” असे म्हटले.

झारखंडमधील दुमका येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या देशात रविवारी सुट्टी असते. जेव्हा येथे इंग्रजांचे राज्य होते तेव्हा ख्रिश्चन समुदाय सुट्टी साजरी करत असे…रविवार हा हिंदूंशी नसून ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. 200-300 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आता त्यांनी एका जिल्ह्यात रविवारच्या सुट्ट्या बंद करून शुक्रवारची सुट्टी केली, असे सांगितले. आधी ते हिंदूंशी लढले, आता ते ख्रिश्चनांशी लढत आहेत. काय चाललंय?"

खाली लिंक केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी रविवारच्या सुट्टीबाबतचे विधान 23. 20 मिनिटांवर पाहायला मिळेल.

PM Modi Ramtek
La Nina 2024: यंदाचा ऑगस्ट-सप्टेंबर अति पावसाचा! यावर्षीच्या मान्सूनबाबत IMD ने काय काय सांगितले?

झारखंडच्या 43 सरकारी शाळांनी त्यांची रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी केली होती. मात्र, 2022 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारने शाळांचा हा निर्णय रद्द करत पुन्हा रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस निश्चित केला.

तपासात असे आढळून आले की, जामतारा येथील अल्पसंख्याकबहुल भागातील काही शाळांनी त्यांची अधिकृत सुट्टी बदलून शुक्रवारी केली होती.

PM Modi Ramtek
दुकानात चहा थोडासा थंड असला तरी लोक कानाखाली मारायचे, लहानपणी खूप अपमान सहन केला- PM मोदी

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, झारखंडमध्ये आदिवासींची संख्या झपाट्याने कमी होत आहे आणि घुसखोरांची संख्या वाढत आहे. आदिवासी मुलींची सुरक्षा आणि जीव धोक्यात आला आहे हे घुसखोर कोण आहेत जे आमच्या मुलींना धोका देत आहेत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com