PM Modi Speech: "17व्या लोकसभेच्या कामांमुळं अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली"; संसदेत PM मोदींचं पार पडलं शेवटचं भाषण

मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला.
Narendra Modi
Narendra Modi
Updated on

PM Modi Last Speech in Loksabha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज लोकसभेत १७ व्या लोकसभेतील शेवटचं भाषण पार पडलं. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. यानंतर महिन्यभरात १८ व्या लोकसभेची निवडणूक होणार आहे.

तत्पूर्वी मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला तसेच या काळातील कामांमुळं अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असंही त्यांनी म्हटलं आहे. (PM Modi last Speech in Loksabha ended 17th Lok Sabha said it on ram temple and others)

Narendra Modi
Pune Accident Video : पुण्यातल्या नवले पुलाजवळ विचित्र अपघात, टँकरची चार वाहनांना धडक; पोलिसही चक्रावले

संसदेत राम मंदिरावरबाबतचा आभार प्रस्ताव सादर करण्यात आला. यावर विविध नेत्यांनी भाषणं दिली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी भाषण केलं. यावेळी त्यांनी आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Narendra Modi
Nikhil Wagle Attack: पुण्यात वागळेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल; महायुतीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये हजर

मोदी म्हणाले, आमच्या कार्यकाळात अनेक रिफॉर्म झाले असून हे सर्वकाही गेमचेंजर ठरलं आहे. २१ व्या शतकाचा मजबूत पाया यामुळं घातला गेला आहे. एका मोठा बदलाच्या दिशेनं देश वेगानं पुढे गेला आहे. यामध्येही सभागृहातील सर्व सहकार्यांनी खूपच चांगलं मार्गदर्शन केलं. मला आनंद आहे की, आपल्या अनेक पिढ्या ज्या गोष्टींची वाट पाहत होत्या, अशी बरीच कामं या १७ व्या लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत. (Latest Marathi News)

अनेक पिढ्यांनी एक संविधानाची वाट पाहिली होती. पण प्रत्येकवेळी संविधानात एक भेग पहायला मिळत होती. एक दरी दिसत होती, एक स्थिरता दिसत होती. पण याच संसदेनं कलम ३७० हटवून संविधानाला पूर्ण रुप दिलं आणि त्याचं प्रगतीकरण झालं. ज्या ज्या महापुरुषांनी संविधान बनवलं त्यांची आत्मा आपल्याला आशीर्वाद देत राहिल.

Narendra Modi
PM Modi Speech: "17व्या लोकसभेच्या कामांमुळं अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली"; संसदेत PM मोदींचं पार पडलं शेवटचं भाषण

७५ वर्षांपासून आपण इंग्रजांनी दिलेल्या दंड संहितेत जगत आलो. पण आता आपण गर्वानं पुढील पिढीला सांगू की ७५ वर्षे भलेही आम्ही दंड संहितेत जगलो पण आता पुढची पिढी ही न्याय संहितेत जगेल. १७ व्या लोकसभेनं अनेक नवे मापदंड ठेवले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याचा आपण उत्सव साजरा केला. या कालखंडात G20 परिषदेची अध्यक्षता भारताला मिळाली. संसदेचं नवं भवनही याच कार्यकाळात झालं, अशा शब्दांत मोदींनी गेल्या पाच वर्षांच्या कामाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.