PM Modi: अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदींना आठवले शरद पवार; म्हणाले...

काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला.
PM Modi: अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदींना आठवले शरद पवार; म्हणाले...
Updated on

नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. विशेष म्हणजे अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधानांना यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आठवण झाली. (PM Modi Lok Sabha Speech No Confidence Motion Manipur Violence BJP Congress)

PM Modi: अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदींना आठवले शरद पवार; म्हणाले...
ECI : "'मोदी निवडणूक आयोग' तयार होतोय"; 'त्या' विधेयकावरुन काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी म्हणाले, "या अविश्वास प्रस्तावात काही अशा विचित्र गोष्टी दिसून आल्या की, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचं बोलण्याच्या यादीत नावचं नव्हतं. मागची उदाहरणं पाहा १९९९ मध्ये वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला त्यावेळी शरद पवारांनी डिबेटचं नेतृत्व केलं. २००३ मध्ये पुन्हा वाजपेयींचं सरकार होत तेव्हा सोनिया गांधींनी चर्चेचं नेतृत्व केलं. त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला" (Marathi Tajya Batmya)

PM Modi: अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदींना आठवले शरद पवार; म्हणाले...
Navneet Rana: "न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे"; राणा दाम्पत्याला कोर्टानं झापलं!

"त्यानंतर २०१८मध्ये मल्लिकार्जुन खर्गे होते विरोधकांचे नेते त्यांनी प्रामुख्यानं विषय पुढे नेला. पण यावेळी अधिरबाबूंची काय अवस्था झाली. त्यांच्या पक्षानं त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. उलट काल अमित शहांनी खूपच जबाबदारीनं म्हटलं की हे चांगलं वाटलं नाही.

पण अध्यक्षांचे आभार मानालया पाहिजेत की त्यांनी वेळ संपली तरी आज बोलायला संधी दिली. पण गुळाचं शेण कसं करायचं यामध्ये हे माहीर आहेत," अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

PM Modi: अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदींना आठवले शरद पवार; म्हणाले...
No Confidence Motion: NDAमध्ये फूट? 'हा' पक्ष विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान

मोदी पुढे म्हणाले, "मला माहिती नाही की तुमची अडचण काय आहे. अधिरबाबूंना का दुर्लक्षित केलं आहे. माहिती नाही की त्यांना कदाचित कलकत्त्याहून फोन आला असेल. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करत आहे. निवडणुकीच्या नावावर त्यांना अस्थायी स्वरुपात सभागृह नेतेपदावरुन हटवून टाकतात. आम्ही अधिरबाबूंप्रती आमची पूर्ण सहवेदना व्यक्त करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.