लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि देशात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमांतर्गत पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार महिन्यांनी पंतप्रधान मोदींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मोदींच्या मन की बातचा हा १११ वा भाग आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी हा कार्यक्रम देशाला दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, आज तो दिवस आला आहे ज्याची आपण सर्वजण फेब्रुवारीपासून वाट पाहत होतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये आलो आहे. एक अतिशय सुंदर म्हण आहे - ‘इति विदा पुनर्मिलनाय’, त्याचा अर्थही तितकाच सुंदर आहे, मी रजा घेतो, पुन्हा भेटू. याच भावनेतून मी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला निवडणूक निकालानंतर पुन्हा भेटेन असे सांगितले होते आणि आज 'मन की बात' सोबत मी पुन्हा तुमच्यामध्ये उपस्थित आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक भारतीय उत्पादने आहेत ज्यांना जगभरात मोठी मागणी आहे आणि जेव्हा आपण स्थानिक भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर जाताना पाहतो तेव्हा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन म्हणजे अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीता रामा राजू जिल्ह्यात या कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे याची लागवड करत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात म्हटलं आहे. नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. या फोर्स टेनिसमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. यावेळी, आमच्या संघाचे खेळाडू कुस्ती आणि घोडेस्वारीच्या त्या श्रेणींमध्ये देखील स्पर्धा करतील, ज्यामध्ये त्यांनी यापूर्वी कधीही भाग घेतला नव्हता.
श्रीमंत असो की गरीब, नोकरदार महिला असो की गृहिणी प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाडे लावत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व देशवासीयांना, जगातील सर्व देशांतील लोकांना त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे. आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची मोहीम झपाट्याने सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद झाला, असंही मोदींनी म्हटलं आहे.
खास प्रकारच्या छत्र्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, या छत्र्या आपल्या केरळमध्ये तयार केल्या जातात. केरळच्या संस्कृतीत छत्र्याला विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि विधींचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलत आहे त्या ‘कार्तुंबी छत्री’ आहेत आणि त्या केरळच्या अट्टप्पाडीमध्ये बनवल्या जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले. मोदी म्हणाले की आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरील अतूट विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे. 2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही. या निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.