लवकरच भारताची 'ड्रोन पॉलिसी'; PM मोदींची शहा, डोवाल, सिंह यांच्यासोबत बैठक

NARENDRA MODI
NARENDRA MODI
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण आणि धोरणांसंबधीच्या चर्चांसाठी ही बैठक घेण्यात येत आहे. तसेच भारताची ड्रोनविषयक धोरण अर्थात ड्रोन पॉलिसी ठरवणं हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचंही सांगण्यात येतंय. यासंदर्भातील वृत सीएनएन-न्यूज18 ने दिलं आहे.

दरम्यान, सध्या काश्मीरमध्ये सुरु असलेल्या एअरफोर्सच्या तळावर ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असल्यानं याबाबत काही खलबते होण्याची शक्यता आहे. भारताकडे लवकरच ड्रोन पॉलिसी असेल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या रविवारी जम्मूमधील एअरबेसवर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आहे. आज चार वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे.

सध्यातरी या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. जम्मूमधील इंडियन एअर फोर्सच्या तळावर काल झालेल्या बॉम्ब हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही बाब समोर आली आहे. एअर फोर्स स्टेशनवर ड्रोनद्वारे पाच मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात इमारतीच्या छताचे नुकसान झाले आहे.

जम्मू पोलिसांनी काल लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्याकडून ६ किलो IED स्फोटके जप्त केली. हा ड्रोन हल्ला त्याच्याशी संबंधित आहे. या ड्रोन हल्ल्याबद्दल सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी फारशी माहिती दिलेली नाही. पण पाक पृरस्कृत दहशतवादी संघटना एका ड्रोनद्वारे हवाई वाहतुकीचे नियंत्र करणारा ATC टॉवर आणि दुसऱ्या ड्रोनद्वारे पार्क केलेले हेलिकॉप्टर किंवा रडारला टार्गेट करण्याची योजना होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.