'Mission Life' लाँच करून मोदींनी दिला पर्यावरणासोबत जगण्याचा 'मंत्र'; जाणून घ्या भाषणातील 10 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केवडिया इथं 'मिशन लाइफ'चा शुभारंभ केला.
PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केवडिया इथं 'मिशन लाइफ'चा शुभारंभ केला.

अहमदाबाद : गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज (गुरुवार) केवडिया इथं 'मिशन लाइफ'चा (Mission Life) शुभारंभ केला. यावेळी मोदींनी जगाला केवळ हवामान बदलासाठी भारत किती काम करत आहे हे सांगितलं नाही, तर पर्यावरण (Environment) रक्षणासह जीवन जगण्याचा मंत्रही दिला.

आपल्या जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करून आपण पर्यावरणाचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मिशन लाइफ आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्याची प्रेरणा देतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. चला तर मग जाणून घेऊया पीएम मोदी त्यांच्या भाषणात काय म्हणाले...

1. 'मिशन लाइफ'चा मंत्र जीवनकाळ आणि पर्यावरण आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक प्रयत्नांसोबतच मी आज या मिशनचं दर्शन जगाला घडवत आहे. आज आपल्या हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, आपल्या नद्या कोरड्या पडत आहेत, हवामानात बदल घडताहेत आणि हे बदल लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत.

2. वातावरणातील बदलामुळं होणारे बदल आजूबाजूच्या लोकांना जाणवत आहेत. गेल्या काही दशकांमध्ये आपण हा दुष्परिणाम झपाट्यानं वाढत असल्याचं पाहिलंय. मिशन लाइफ या पृथ्वीच्या संरक्षणासाठी लोकांच्या शक्तींना एकत्र करतं. मिशन लाइफचा असा विश्वास आहे की, लहान प्रयत्नांचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो.

3. मिशन LiFE P3 ची संकल्पना मजबूत करेल. P3 म्हणजे 'प्रो प्लॅनेट पीपल'. आज आपण अशा जगात वावरत आहोत, जिथं कोण कोणत्या देशाच्या किंवा गटाच्या सोबत किंवा विरोधात आहे याची चर्चा होत आहे. पण, मिशन LiFE 'प्रो प्लॅनेट पीपल' अंतर्गत एकत्र येतं आणि कल्पनेशी एकरूप होतं. हे ग्रहाची जीवनशैली या मूलभूत तत्त्वाचं पालन करतं.

4. आम्ही एलईडी बल्बची योजना सुरू केली आणि देशातील खासगी क्षेत्र देखील त्यात सहभागी झाले. भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, अल्पावधीतच भारतातील लोकांनी त्यांच्या घरात 160 कोटींहून अधिक एलईडी बल्ब बसवले, त्यामुळं 100 दशलक्ष टनांपेक्षा जास्त CO2 उत्सर्जन कमी झालं.

PM Narendra Modi
Guinness World Record : नाद करा, पण आमचा कुठं? 'या' महिलेनं सर्वात वेगानं चहा बनवण्याचा केला विश्वविक्रम!

5. गुजरात हे भारतातील एक राज्य आहे, ज्यानं ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनं पहिली पावलं उचलण्यास सुरुवात केली. हवामान बदलाबाबतची धारणा ही जणू काही धोरणात्मक बाब आहे.

6 'मिशन लाइफ' आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रेरित करतं. आपली जीवनशैली निश्चित करून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. आपला राष्ट्रीय गौरव सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. हवामान बदलाच्या विरोधात एकता हा जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे.

PM Narendra Modi
Mayawati : काँग्रेसला वाईट काळातच दलितांची का आठवण येते, हेच का त्यांचं खरं प्रेम? मायावतींचा थेट सवाल

7. कालव्यांवर सौर पॅनेल बसवणं असो किंवा दुष्काळी भागात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलसंधारण मोहीम असो, गुजरात नेहमीच ट्रेंडसेटर राहिलं आहे. हवामान बदलाबाबत असं गृहितक बांधलं गेलं आहे की, जणू ती केवळ धोरणाशी संबंधित बाब आहे. मिशन लाइफ आपल्याला प्रेरणा देतं की, आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच काही करू शकतो, ज्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होईल.

8. गुजरात हे महात्मा गांधींचं जन्मस्थान आहे. ते अशा विचारवंतांपैकी एक होते, ज्यांना पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्याचं महत्त्व फार पूर्वी समजलं होतं. त्यांनी विश्वस्तपदाची संकल्पना विकसित केली. मिशन लाइफ आपल्या सर्वांना पर्यावरणाचं विश्वस्त बनवतं.

PM Narendra Modi
Railway : भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा 'रेल्वे' अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

9. हवामान बदलासारख्या जागतिक समस्येवर भारत आघाडीवर काम करत आहे. आज भारत हे प्रगतीचं आणि निसर्गाचंही उत्तम उदाहरण आहे. आज भारत ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे आणि आपलं वनक्षेत्रही वाढलं असून वन्यजीवांची संख्याही वाढत आहे.

10. 'मिशन लाइफ' ही एक जागतिक चळवळ आहे, जी पृथ्वीला हवामान बदलाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. हवामान बदल हा सरकारी धोरणाचा विषय बनला आहे. परंतु, धोरणाच्या पलीकडं जाण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.