''PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर...'', राहुल गांधींचं वादग्रस्त विधान

PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर सर्वसाधारण प्रवर्गातून येतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नेहरुंवर टीका केली होती.
bihar nitish kumar politics join bjp rahul gandhi open up castwise census
bihar nitish kumar politics join bjp rahul gandhi open up castwise censusEsakal
Updated on

नवी दिल्लीः PM मोदी OBC म्हणून जन्माला आलेले नाहीत, ते तर ओपन प्रवर्गातून येतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नेहरुंवर टीका केली होती.

काय म्हणाले होते मोदी?

''एकदा नेहरूंनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं. त्यात ते म्हणतात, मला कुठल्याही प्रकारचे आरक्षण पसंत नाही. विशेषतः नोकऱ्यांमधील आरक्षण तर कधीच नाही. मी अशा कुठल्याही निर्णयाच्या विरोधात आहे जो अकुशलतेच्या वाढीस चालना देईल. जो दुय्यम दर्जाकडे घेऊन जाईल. ही पंडीत नेहरूंनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहीलेलं पत्र आहे. त्यामुळे हे जन्मजात आरक्षणाच्या विरोधी आहेत, असं मी म्हणतो.'' अशा शब्दात मोदींनी टीका केली होती.

काँग्रेसला बाबासाहेबांना भारतरत्न द्यायचा नव्हता- मोदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचीही काँग्रेसची तयारी नव्हती. जेव्हा भाजपच्या समर्थनानं दुसरं सरकार स्थापन झालं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

नेहरू म्हणायचे की, जर SC, ST आणि ओबीसींना नौकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं तर सरकारी कामकाजाचा स्तर खालावेल, असाही दावा मोदींनी केला.

मोदी स्वतःला ओबीसी समजतात मात्र ते ओबीसी नाहीत, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून येतात, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.