Modi on BR Ambedkar: काँग्रेसला आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता तो भाजपनं दिला; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बाबासाहेबांच्या विचारांना संपवण्याची कोणतीही कसर काँग्रेसनं सोडली नाही.
PM Modi
PM Modi
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर नेहमीप्रमाणं हल्लाबोल केला. हे करताना त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांना पुन्हा एकदा टार्गेट केलं.

तसेच घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना काँग्रेसला डॉ. आंबेडकारांना भारतरत्न द्यायचा नव्हता, पण पुढे भाजपनं त्यांना भारतरत्न दिला, असं मोदींनी यावेळी सांगितलं. (pm modi on br ambedkar congress did not want to give bharatratna to ambedkar but bjp gave it)

काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, "SC, ST आणि ओबीसींना मोठी भागिदारी देण्यामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कायमच अडचणीचं होतं. काँग्रेसनं बाबासाहेबांचे विचार संपवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. (Latest Marathi News)

PM Modi
PM Modi in Rajya Sabha : 'मला कोणतेही आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच', PM मोदींनी वाचून दाखवलं नेहरूंचं पत्र

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचीही काँग्रेसची तयारी नव्हती. उलट जेव्हा भाजपच्या समर्थनानं दुसरं सरकार स्थापन झालं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. (Marathi Tajya Batmya)

PM Modi
Nagpur Bus Tiffin Bomb: नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन बॉम्ब'; तीन दिवस डेपोतच होती उभी बस

नेहरू म्हणायचे की, जर SC, ST आणि ओबीसींना नौकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं तर सरकारी कामकाजाचा स्तर खालावेल. आज हे जी आकडेवारी सांगतात त्याचं मूळ इथेच आहे. जर एससी, एसटी, ओबीसींची संख्या आज सरकारी संस्थांमध्ये कमी आहे तर त्याचं कारण त्यावेळी सरकारी भरतीत त्यांचा समावेश झाला असता तर ते प्रमोशनसह आज पुढे गेले असते आणि आज इथं पोहोचले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.